श्री ज्ञानेश्वर शिक्षण संस्थेत प्रजासत्ताक दिन व वार्षिक पारितोषिक वितरण समारोह उत्साहात साजरा


आळंदी : प्रजासत्ताक दिनानिमित्त श्री ज्ञानेश्वर शिक्षण संस्थेत श्री ज्ञानेश्वर विद्यालय व ज्युनिअर कॉलेजच्या ध्वजाचे ध्वजारोहण संस्थेचे जेष्ठ विश्वस्त लक्ष्मण घुंडरे, सचिव अजित वडगावकर यांच्या प्रमुख उपस्थितीत व संस्थेचे अध्यक्ष सुरेश वडगावकर यांच्या शुभहस्ते मोठ्या दिमागदार वातावरणामध्ये संपन्न झाले.

याप्रसंगी ज्यांच्या शुभहस्ते वार्षिक पारितोषिक वितरण सोहळा संपन्न झाला असे दिलीप देशमुख, प्रमुख उपस्थिती ॲड. मुकेश परदेशी, मुख्याधिकारी कैलास केंद्रे समवेत संस्थेचे सदस्य अनिल वडगावकर, बाबुलाल घुंडरे, सुरेश दौंडकर, तरकासे साहेब, सचिन गायकवाड, मितल पाटील, विश्वनाथ नेटके, विद्यालयाचे प्राचार्य दीपक मुंगसे, उपप्राचार्य सूर्यकांत मुंगसे, प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक प्रदीप काळे, पर्यवेक्षक किसन राठोड, प्रशांत सोनवणे, अशोक बनकर, अनिता गावडे, शिक्षक प्रतिनिधी नारायण पिंगळे, शिक्षकेतर प्रतिनिधी सोमनाथ आल्हाट, सर्व विभागातील शिक्षक – शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी, पालक, ग्रामस्थ आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

देशाच्या स्वातंत्र्यासाठी बलिदान देणाऱ्या क्रांतिवीरांना व देशाला राज्यघटना संविधान बहाल करणाऱ्या सर्व थोर पुरुषांना अभिवादन करून वार्षिक पारितोषिक वितरण कार्यक्रमाच्या निमित्ताने सुरेश वडगावकर व अजित वडगावकर यांनी जीवनात जे ही कार्य कराल ते आपण आपल्या आनंदासाठी करावे तसेच विद्यार्थ्यांनी शालेय शिक्षणाबरोबर आपल्या आतल्या कलागुणांचा विकास करून आपले व शाळेचे नाव लौकिक करावे असे प्रेरित करत सर्व विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.

मुकेश परदेशी यांनी आपण ज्या शाळेत शिकलो, खेळलो बागडलो त्या शाळेत प्रमुख अतिथी म्हणून जो सन्मान मिळाला त्याचा आनंद व्यक्त केला व सर्व विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. दिलीप देशमुख यांनी एवढी मोठी विद्यार्थी संख्या असताना मराठी शाळेचा दर्जा टिकविणे खूप चिकाटीचे काम असल्याने आपण ते प्रामाणिकपणे करता असे वक्तव्य करून संस्थेचे कौतुक केले. व जीवनातील चार दिव्यांचे महत्त्व सांगत असेचा दिवा कधीही मावळू देऊ नका असा मोलाचा सल्ला दिला.

कार्यक्रमादरम्यान कैलास केंद्रे यांनी भारताची लोकशाही अजून प्रबळ व मजबूत करण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रेरित करून शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाच्या निमित्ताने भव्य क्रीडा महोत्सवानिमित्त घेण्यात आलेल्या विविध स्पर्धेत व स्पर्धा परीक्षेत प्राविण्य मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांना ट्रॉफी, मेडल, शैक्षणिक साहित्य, रोख पारितोषिक व प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन योगेश मठपती यांनी केले व उपस्थितांचे आभार दीपक मुंगसे यांनी व्यक्त केले.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!