हवेलीचे सभापती युवराज काकडे यांनी ठरविली संधीला कृतीची जोड; अल्पवधीतच तरुण सभापतीचा कार्य जिल्ह्यात चर्चेत; उत्तम लोकप्रतिनिधीचा जनतेकडूनच दाखला…


जयदिप जाधव                                         उरुळीकांचन : ‘संधीचे सोने करा’ ही म्हण विश्वासाला सार्थ ठरविणारी व कर्तृत्ववान कृतीची प्रचिती करणारी ठरत असते अशीच संधीला कृतीची जोड ठरविणारी कृती पदाची संधी मिळता करुन दाखविण्याची किमया हवेली पंचायत समितीचे सभापती युवराज काकडे यांच्या कामाच्या पोच पावतीने हवेली तालुक्यात पहायला मिळत आहे.एक तरुण सभापती सामाजिक भान तसेच अभ्यासू वृत्तीने कामाची झलक कशी देऊ शकतो असे मूर्तीमंद उदाहरण आता युवराज काकडे यांच्या कामाच्या सूक्ष्मनियोजन कृतीने तालुक्याला पहायला मिळत आहे.

 

हवेली पंचायत समितीचे सभापती युवराज काकडे यांच्या अभ्यासू कार्याची झलक तालुक्यात चर्चेचा विषय ठरली असून एक उत्तम आरोग्य दूत आपल्या कामाची उंच अल्पकाळात कशी वाढू शकतो असा उदाहरण काकडे यांच्या कामगिरीने सर्वत्र चर्चेचा विषय ठरु लागले आहे.एक अभ्यासू नेतृत्व कामाची छाप कसे सोडू शकते याचे उत्तम उदाहरण आदर्श लोकप्रतिनिधी व उत्तम प्रशासकाच्या रुपाने तालुका पाहत आहे.

पूर्व हवेलीत साधारण मुख्यमंत्री सहाय्यता कक्ष स्थापन झाल्यापासून गरीब रुग्णांना मदतीचा हात मिळून देण्यात युवराज काकडे यांचा अल्प परिचय आता हवेलीत पंचायत समिती सभापती पदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर वट वृक्षाप्रमाणे बहरला जावू लागला आहे.लोकप्रतिनिधीला उत्तम प्रशासक व कर्तव्याची जोड देवून त्यांनी स्थानिक स्वराज्य संस्थेचे अस्तित्व गमावू लागलेल्या पंचायत समितीसारख्या पदातून जनतेला न्याय देण्याचा प्रयत्न त्यांनी चालू केला आहे.

कर्तव्यनिष्ठ अंगणवाडी ते शिक्षक कर्मचाऱ्यांचे योग्य कौतुक असू की पंंचायत समितीच्या पडझड झालेल्या कार्यालयास मदतीचा कटाक्ष, दुर्घटनाग्रस्त रस्ते ते उड्डाणपूल प्रशासनाला जाग आणून दुरुस्त करण्याचा दृष्टीक्षेप, पाणंद ,शिवार रस्ते अभिमान, छत्रपती राजस्व अभियान समाधान शिबीर तसेच विहीर- बोअरवेल साधनांची घसरलेल्या पाणीपातळीत जनजागृती ते उपाययोजना,नळ- हापसा दुरुस्तीचे दुर्भिक्ष काम , जिल्हा व तालुका आरोग्य व्यवस्थेत बदल घडवून आणण्याची व्यवस्था, वीजेचा भारनियमनचा प्रश्न तसेच अभ्यासू कामांना न्याय देण्याची भूमिका त्यांच्या कामाच्या पावतीत दिसू लागल्याने त्यांच्या कृतीचा डंका सर्वत्र पिटू लागला आहे.

 

हवेली पंचायत समितीच्या सभापतीपदामाध्यमातुन त्यांनी सुरू केलेला प्रवास प्रौढावलेल्या हवेली तालुक्याला एक दिशादर्शक असून तालुक्यात फक्त पद व प्रतिष्ठेसाठी पदाचा उपभोग करण्यापेक्षा समाजाला त्या पदापासून काही दिलासा मिळतो काय असा एक नवा अशावाद त्यांच्या कृतीतुन दिसून येत असून तरुणांकडे एक आदर्शवादी राजकारणाकडे बघण्याची किमया त्यांच्या कृतीतून जाणवत आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!