वडिलांच्या अपमानाचा बदला म्हणून किशोर आवारेंचा खून, तपासात धक्कादायक माहिती आली समोर

पुणे : दोन दिवसांपूर्वी पुण्यातून एक खळबळजनक बातमी समोर आली. येथील जनसेवा विकास आघाडीचे संस्थापक अध्यक्ष किशार आवारे यांच्यावर तळेगाव नगरपरिषदेच्या कार्यालयासमोर प्राणघातक हल्ला झाला. या हल्ल्यात त्यांचा मृत्यू झाला. यामुळे एकच खळबळ उडाली.

असे असताना आता तपासात धक्कादायक माहिती समोर आली आहे. माजी नगरसेवक भानू खळदे यांचा मुलगा गौरवने बदला घेण्यासाठी या हत्येचा कट रचल्याचे पोलिस तपासात समोर आलेले आहे. माजी नगरसेवक भानू खळदे यांच्याविरोधात वृक्षतोड केल्याची तक्रार किशोर आवारे यांनी नगरपरिषदेच्या सीईओकडे केली होती.
असे असताना ही वृक्षतोड परवानगीने होती असा दावा भानू खळदे यांनी केला होता. मात्र यावरुन आवारे यांनी भानू खळदे यांना सर्वांदेखत मुस्काटात लावली. याच अपमानाचा बदला घेण्यासाठी मुलगा गौरव खळदेनी हत्येचा कट रचल्याचे समोर आले आहे.

दरम्यान, या हत्येचा कट मावळमधील राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सुनील शेळकेंनी रचल्याचा आरोप आवारे यांच्या आईने केला होता. या खून प्रकरणी पिंपरी-चिंचवड पोलिसांनी एकुण चौघांना अटक केली होती.
