तिच कंपनी अन् पवार कुटुंबीय! सुनेत्रा पवारांच्या खासगी विमानात बिघाड; राष्ट्रवादीचे कोणते नेते होते सोबत?


पुणे : उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या खाजगी विमानात 9 जून रोजी उड्डाणापूर्वी तांत्रिक बिघाड झाल्याची माहिती समोर आली आहे. मुंबईहून दिल्लीकडे रवाना होण्याच्या तयारीत असताना वैमानिकाच्या निदर्शनास हा बिघाड आल्याने विमानाचे उड्डाण सुमारे दोन तास विलंबाने झाले. सुदैवाने बिघाड वेळेत लक्षात आल्याने संभाव्य दुर्घटना टळली.

मिळालेल्या माहितीनुसार, सुनेत्रा पवार यांचे खाजगी विमान 9 जून रोजी सायंकाळी 5 वाजता मुंबईहून दिल्लीकडे रवाना होणार होते. मात्र, उड्डाणापूर्वीच विमानात तांत्रिक अडचण असल्याचे लक्षात आल्यानंतर विमानाची तपासणी करण्यात आली.

या बिघाडामुळे विमान सुमारे दोन तास मुंबई विमानतळावरच थांबवून ठेवावे लागले. तांत्रिक दोष दूर केल्यानंतर आणि आवश्यक तपासण्या पूर्ण झाल्यानंतर हे विमान रात्री 7 वाजता दिल्लीसाठी रवाना झाले.

या विमानात सुनेत्रा पवार यांच्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते पार्थ पवार, खासदार सुनील तटकरे आणि खासदार प्रफुल्ल पटेल हेही प्रवास करत होते. हे सर्व नेते दिल्लीतील महत्त्वाच्या बैठकीसाठी जात असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

संबंधित विमान हे ‘व्हीएसआर’ कंपनीचे असल्याचे सांगितले जात आहे. तांत्रिक बिघाड दूर केल्यानंतर याच विमानातून सर्व प्रवाशांनी दिल्लीचा प्रवास पूर्ण केला. या घटनेत कोणतीही जीवितहानी किंवा इतर नुकसान झाले नसून सर्व प्रवासी सुरक्षित असल्याचे सांगण्यात आले आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!