आई आणि पत्नी मला माझ्याच फ्लॅटमध्ये येऊ देत नाहीत; ४२ वर्षीय व्यक्तीची पोलिसांत धाव, नेमकं काय घडलं?


पुणे : पुण्यातील खराडी परिसरात कौटुंबिक वादातून धक्कादायक प्रकार समोर आला आहे. स्वतःच्या मालकीच्या घरात प्रवेश करण्यास मज्जाव केल्याचा आरोप करत एका व्यक्तीने आपल्या आई आणि पत्नीविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणी खराडी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

तक्रारदार अमरजितसिंग भूपेंद्र कपूर (वय ४२) हे खराडी येथील पंचशील टॉवरमध्ये राहतात. त्यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, २०२२ मध्ये त्यांनी सदर सदनिका खरेदी केली होती. मात्र काही दिवसांपूर्वी नोकरी गेल्यामुळे गृहकर्जाचे हप्ते भरणे कठीण झाले होते. त्यामुळे सदनिका भाड्याने देऊन दुसरीकडे राहण्याचा प्रस्ताव त्यांनी कुटुंबीयांसमोर ठेवला होता.

दरम्यान, कपूर आणि त्यांच्या पत्नीमध्ये वैवाहिक वाद सुरू असून, दोघांनीही कौटुंबिक न्यायालयात घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला आहे. तसेच सदनिका रिकामी करून देण्याबाबतही न्यायालयात दाद मागण्यात आली होती.

तक्रारीनुसार, ६ जून रोजी रात्री कपूर हे आपल्या सदनिकेत गेले असता त्यांना घरात प्रवेश नाकारण्यात आला. यावेळी सदनिकेचे बायोमेट्रिक लॉक काढून त्याठिकाणी कडी-कोयंडा बसविण्यात आल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. तसेच आई आणि पत्नीने संगनमत करून त्यांना घरात येण्यास मज्जाव केल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

या घटनेनंतर कपूर यांनी खराडी पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. पोलिसांनी तक्रारीची दखल घेत आई आणि पत्नीविरोधात गुन्हा नोंदवला असून प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!