बारामती, शिरूर, दौंडसह अनेक ठाण्यांत खांदेपालट; 30 पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या..

पुणे : पुणे ग्रामीणचे जिल्हा पोलिस अधीक्षक संदीपसिंह गिल्ल यांनी जिल्ह्यातील पोलिस प्रशासनात मोठे फेरबदल करत 30 पोलिस निरीक्षक आणि सहाय्यक पोलिस निरीक्षकांच्या बदल्यांचे आदेश जारी केले आहेत. सोमवारी (दि. 8) हे आदेश काढण्यात आले. या बदल्यांमध्ये बारामती तालुका पोलिस ठाण्याचे निरीक्षक चंद्रशेखर यादव यांची शिक्रापूर येथे बदली करण्यात आली असून त्यांच्या जागी नारायण पवार यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
बदली झालेल्या अधिकाऱ्यांची नावे पुढीलप्रमाणे आहेत

पोलिस निरीक्षक :
दत्तात्रय किसन गुंड (नियंत्रण कक्ष ते जुन्नर), कुमार रामचंद्र कदम (सासवड ते रांजणगाव एमआयडीसी), चंद्रशेखर मोहनराव यादव (बारामती तालुका ते शिक्रापूर), विनोद भगवान पाटील (नियंत्रण कक्ष ते शिरूर), सचिन दिनकर पाटील (नियंत्रण कक्ष ते लोणावळा शहर), राजेश नारायणराव रामाघरे (लोणावळा शहर ते हवेली), संतोष वसंत तासगावकर (आर्थिक गुन्हे शाखा ते यवत), हेमंत गणपत शेडगे (नियंत्रण कक्ष ते दौंड), विजयमाला महादेव पवार (जिल्हा विशेष शाखा ते उरुळी कांचन), संतोष शामराव जाधव (जिल्हा वाहतूक शाखा ते राजगड), महादेव नारायण वाघमोडे (रांजणगाव एमआयडीसी ते आर्थिक गुन्हे शाखा), संदेश अरुण केंजळे (शिरूर ते आर्थिक गुन्हे शाखा), वैशाली रावसाहेब पाटील (हवेली ते महिला कक्ष), नारायण शिवाजी देशमुख (यवत ते एफआरओ, पुणे ग्रामीण), राजेश गणेश गवळी (राजगड ते अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक विभाग), नीलेश पांडूरंग माने (वाहतूक शाखा, बारामती ते भोर), संतोष श्रीमंत घोळवे (टीएमसी, पुणे ग्रामीण ते सासवड), रवींद्र दत्तात्रय पाटील (एफआरओ, पुणे ग्रामीण ते जेजुरी), नारायण विनायकराव पवार (नियंत्रण कक्ष ते बारामती तालुका), महेश नामदेव मेश्राम (सुरक्षा शाखा ते सायबर पोलिस ठाणे), गोपाळ बासू पवार (दौंड ते जिल्हा वाहतूक शाखा), महेश रामेश्वर स्वामी (नियंत्रण कक्ष ते वाहतूक शाखा, बारामती), दिपरतन गोरख गायकवाड (शिक्रापूर ते जिल्हा विशेष शाखा), विकास जगन्नाथ भुजबळ (नियंत्रण कक्ष ते सुरक्षा शाखा).
सहाय्यक पोलिस निरीक्षक :
नागनाथ गुरुसिद्ध पाटील (वडगाव निंबाळकर ते नियंत्रण कक्ष), दिपक भाऊसाहेब वाघचौरे (जेजुरी ते आर्थिक गुन्हे शाखा), जीवन शांताराम मोहिते (इंदापूर ते वडगाव निंबाळकर), सोमनाथ पांडूरंग शेंडगे (नियंत्रण कक्ष ते भिगवण), कुलदीप दत्तात्रय संकपाळ (स्थानिक गुन्हे शाखा ते माळेगाव) आणि विनोद जगन्नाथ महांगडे (भिगवण ते आर्थिक गुन्हे शाखा).

या बदल्यांमुळे पुणे ग्रामीण पोलिस दलातील अनेक महत्त्वाच्या पोलिस ठाणे व शाखांमध्ये नवीन नेतृत्व मिळाले असून आगामी काळात प्रशासकीय कामकाजाला अधिक गती मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
