उरुळी कांचन येथे दुकानदाराकडून तरुणीचा विनयभंग; दुकानदाराविरुद्ध गुन्हा दाखल..


उरुळी कांचन : दुकानदाराकडे अंडी खरेदी करण्यासाठी गेलेल्या एका 23 वर्षीय महाविद्यालयीन तरुणीचा विनयभंग केल्याची धक्कादायक घटना रविवारी (ता. 07) उरुळी कांचन ग्रामपंचयाय हद्दीत दुपारी घडली. याबाबत एकावर उरुळी कांचन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बाबुलाल रसुफभाई मुलाणी (वय व पत्ता माहिती नाही) असे गुन्हा दाखल झालेल्या दुकानदाराचे नाव आहे. याबाबत एका 23 वर्षीय तरुणीने उरुळी कांचन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित तरुणी ही पुणे विद्यापीठात शिक्षण घेत आहे. तर उरुळी कांचन ग्रामपंचायत जवळील ओढ्याशेजारी संशयित आरोपी बाबुलाल मुलाणी याचे ‘नियामत फ्रेश सुपर मार्केट’ नावाचे चिकन व किराणा दुकान आहे.

रविवार (ता. 07) दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास पीडित तरुणी तिच्या मैत्रिणीसह सदर दुकानात अंडी आणण्यासाठी गेली होती. त्यावेळी दुकानात बाबुलाल मुलाणी आणि त्याचा मुलगा आय्यात मुलाणी हे ग्राहकांना साहित्य देत होते.

तरुणी काउंटरवर उभी राहून अंडी निवडत असताना, आरोपी बाबुलाल मुलाणी हा काउंटरच्या बाहेर आला. त्याने पीडित तरुणीच्या मनास लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केल्याचे फिर्यादित म्हटले आहे.

दरम्यान, या अनपेक्षित प्रकारामुळे घाबरलेल्या तरुणीने तातडीने उरुळी कांचन पोलीस ठाणे गाठून फिर्याद दिली. पीडितेच्या जबाबानुसार पोलिसांनी आरोपी बाबुलाल रसुफभाई मुलाणी याच्याविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हवादार चोरमले करत आहेत.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!