विषारी दारू पिल्यामुळे पुण्यात 15 जणांचा मृत्यू, घरी आले अन्…! दारूकांडाने शहर हादरलं

पुणे : सध्या पिंपरी चिंचवड आणि पुणे हादरून गेले आहे. गेल्या दोन दिवसात या दोन्ही शहरात एकूण 15 लोकांचा मृत्यू झाला आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. यामध्ये 11 जणांचा मृत्यू विषारी दारू प्यायल्याने झाला आहे, तर चार जणांचा मृत्यू इतर कारणाने झाला आहे. यामुळे सगळेच हादरले आहेत.

दारू पिऊन घरी आल्यावर तोंडातून फेस आला, कुणाला चक्कर आल्याने बाथरूममध्ये पडले तर कुणाला हृदयविकाराचा झटका आल्याने मृत्यू झाल्याची माहिती आहे. या दारूकांडप्रकरणी आतापर्यंत एकाला अटक करण्यात आली असून पोलीस अधिक तपास करत आहेत.
यामध्ये सध्या मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. मृतांमध्ये तरुणांपासून वृद्धांपर्यंतचा समावेश आहे. अचानक झालेल्या या प्रकारामुळे पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये एकच खळबळ उडाली आहे. याबाबत तपास सुरू करण्यात आला आहे. अनेक ठिकाणी धाड टाकली आहे.

राज्य उत्पादन शुल्क विभागाने विषारी दारू मृत्यू प्रकरणी योगेश वानखेडे याला अटक केली. तो स्वतः पोलिसांसमोर हजर झाला, त्याला अटक करून चौकशी सुरू करण्यात आली. फुगेवाडी भागात एकाच दिवशी 8 जणांच्या मृत्यूने खळबळ उडाली.

त्यापैकी 6 जणांचा मृत्यू हा विषारी दारूमुळे झाल्याचे समोर आले. अटकेतील आरोपी योगेश वानखेडेच पिंपरी चिंचवडमधील फुगेवाडी आणि पुण्याच्या हडपसर भागात केमिकलयुक्त स्पिरिट पोहोचवलं होतं. याबाबत आता तपास सुरू करण्यात आला आहे.