बारमधील ओळख ठरली महागात! तरुणीने इंजिनिअर तरुणासोबत केलं धक्कादायक कृत्य, दीड वर्षांपासून…


मुंबई : नवी मुंबईतील वाशी परिसरात एका सिव्हिल इंजिनिअरसोबत धक्कादायक हनीट्रॅप प्रकरण समोर आले आहे. बारमध्ये झालेल्या ओळखीचा गैरफायदा घेत एका तरुणीने इंजिनिअरला प्रेमाच्या जाळ्यात अडकवत तब्बल दीड वर्षे ब्लॅकमेल केल्याची माहिती उघड झाली आहे. बदनामीची धमकी देत संबंधित तरुणीकडून तब्बल १३ लाख रुपये उकळण्यात आल्याने खळबळ उडाली आहे.

पीडित चेतन लोखंडे हे मूळचे जालना जिल्ह्यातील रहिवासी असून ते सिव्हिल इंजिनिअर म्हणून काम करतात. साधारण दीड वर्षांपूर्वी ते वाशी परिसरातील एका बारमध्ये गेले असताना त्यांची ठाण्यातील एका तरुणीशी ओळख झाली. सुरुवातीला मैत्रीच्या नावाखाली जवळीक वाढवत तरुणीने लोखंडे यांच्या वैयक्तिक आयुष्याची, कुटुंबाची आणि आर्थिक स्थितीची माहिती मिळवली.

विश्वास संपादन केल्यानंतर संबंधित तरुणीने इंजिनिअरला ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली. विविध कारणे सांगून पैशांची मागणी करण्यात आली. सुरुवातीला काही रक्कम दिल्यानंतर लोखंडे यांनी पैसे देण्यास नकार दिला. त्यानंतर तरुणीने “तुझे आक्षेपार्ह फोटो कुटुंबीयांना पाठवेन आणि समाजात बदनामी करेन,” अशी धमकी दिली.

या धमकीमुळे घाबरलेल्या इंजिनिअरने मागील दीड वर्षांत तब्बल १३ लाख रुपये दिल्याची माहिती समोर आली आहे. मात्र तरीही संबंधित तरुणीचा पैशांसाठी तगादा सुरूच होता. सततचा मानसिक छळ आणि ब्लॅकमेलिंग असह्य झाल्यानंतर अखेर चेतन लोखंडे यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली.

लोखंडे यांच्या फिर्यादीवरून सदर बाजार पोलीस ठाण्यात संबंधित महिलेविरोधात खंडणी आणि माहिती तंत्रज्ञान कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपी महिलेचा शोध सुरू केला असून तिचे लोकेशन ट्रॅक करून अटक करण्यासाठी विशेष पथक रवाना करण्यात आले आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!