मित्राने उसने पैसे न दिल्याने महाविद्यालयीन तरुणाने वसतीगृहात केली आत्महत्या, चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात गुन्हा..

पुणे : उसने दिलेले पैसे मित्राने परत केले नाही, म्हणून मराठवाडा मित्र मंडळाच्या लॉ काॅलेजमध्ये शिकणाऱ्या तरुणाने विद्यार्थी सहायक समितीच्या गोखलेनगर येथील वसतीगृहात गळफास घेऊन आत्महत्या केली.

राज रावसाहेब गर्जे (वय २२, मुळ रा. पाटसरा, ता. आष्टी, जि. बीड) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकणी रावसाहेब गर्जे (वय ४९, रा. पाटसरा, बीड) यांनी चतु:श्रृंगी पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी एका तरुणाच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
ही घटना विद्यार्थी सहायक समितीच्या गोखलेनगर येथील वसतीगृहात मंगळवारी सायंकाळी साडेसहा वाजता उघडकीस आली.

मिळालेल्या माहिती नुसार, राज गर्जे हा मराठवाडा मित्र मंडळ लॉ कॉलेज येथे तिसऱ्या वर्षात शिक्षण घेत होता. तसेच त्याच्याकडून त्याच्या मित्र निरुपम जोशी ५० हजार रुपये घेतले होते. ते तो परत करत नव्हता. राजने अनेकदा पैसे मागितले होते.

पैसे मागितल्यावर त्याच्या मित्राने त्याला धमकी दिली. पैसे ते परत देत नसल्याच्या त्रासाला कंटाळून राज याने रुमवर गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्या करण्यापूर्वी त्याने एक चिठ्ठी लिहून ठेवली. असून निरुपम जोशी याच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या करत असल्याचे म्हटले आहे.
दरम्यान त्याच्या मित्रावर गुन्हा दाखल करण्यात आला असून या घटनेचा पुढील तपास पोलीस करीत आहेत.