सत्तासंघर्षाची सुनावणी सुरू असतानाच राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांना ईडीची नोटीस…

मुंबई : आज राज्यातील सत्तासंघर्षावर सुनावणी होणार आहे. असे असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना ईडीकडून नोटीस बजावण्यात आली आहे. आयएल व एफएस प्रकरणी ही नोटीस बजावण्यात आली आहे. सोमवारी ईडीच्या कार्यालयात त्यांना चौकशीसाठी 12 मे रोजी हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

दरम्यान, आयएल आणि एफएस (IL & FS) या कंपनीच्या व्यवहारांची ईडीकडून चौकशी सुरू होती. कंपनीने दिवाळखोरी जाहीर केली होती. या कंपनीच्या माध्यमातून मोठा आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा आरोप होता. यामुळे याची चौकशी होणार असल्याचे सांगितले जात आहे.
याआधीही या कंपनी प्रकरणी राज ठाकरे यांनाही नोटीस पाठवण्यात आली होती. आर्थिक व्यवहारात अनियमितता होती. यात मनी लाँड्रिंग झालं आणि पोलिसांनी यात गुन्हा दाखल केला होता.

या प्रकऱणी अरुणकुमार साहा यांना ताब्यात घेऊन चौकशी केली होती. यामध्ये अनेक नावे समोर आली होती. त्यात जयंत पाटील यांच्याही नावाचा समावेश आहे. यामुळे त्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.
ईडीने नोटीस पाठवल्याच्या वृत्तावर जयंत पाटील यांनी मात्र अद्याप अशी कोणती नोटी मिळाली नसल्याचं म्हटलं आहे. यामुळे आता काय होणार हे येणाऱ्या काळात समजेल.