मोठी बातमी! पेट्रोल डिझेलचा पुन्हा एकदा भडका, चारच दिवसात दुसऱ्यांदा मोठी वाढ, जाणून घ्या नवीन दर…

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून देशातील वातावरण अस्थिर आहे. पेट्रोल डिझेलचे दर वाढत आहेत. आता अवघ्या चार दिवसात पुन्हा एकदा पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये वाढ करण्यात आली आहे. पेट्रोलच्या दरात हे 91 पैशांनी तर डिझेलच्या दर 94 पैशांनी वाढ करण्यात आली आहेत.

यामुळे याचा सर्वसामान्य लोकांना त्रास होत आहे. महागाई वाढत चालली आहे. मुंबईतील पेट्रोलच्या दर थेट 107.49 तर डिझेलचा भाव प्रति लिटर 94.02 रुपयांच्या घरात पोहोचला आहे. 15 तारखेला पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत तीन रुपयांनी वाढ करण्यात आली होती. यामुळे संताप व्यक्त केला जात आहे. सध्या विरोधक केंद्र सरकारवर टीका करत आहे.
आता अवघ्या चार दिवसांत पुन्हा एकदा दरवाढ करण्यात आल्यामुळे नागरिकांमध्ये रोष निर्माण होत आहे. यापूर्वी 15 मे रोजी पेट्रोलच्या दरात 3 रुपये आणि डिझेलच्या दरात 3.11 रुपयांची मोठी वाढ करण्यात आली होती. यामुळे पुढील काळात यावरून राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे.

आज सकाळपासून हे नवे दर लागू झाले आहेत. गेल्या काही दिवसांपूर्वी काही राज्यात निवडणूक होती, ती झाल्यानंतर केंद्र सरकारने यापैकी काही भार सर्वसामान्यांवर टाकायचे ठरवले असून त्यामुळे पेट्रोल आणि डिझेलच्या भावात वाढ होताना दिसत आहे. यामुळे अडचण निर्माण झाली आहे.

आगामी काळात खनिज तेलाचे दर वाढून पेट्रोलियम कंपन्यांचा तोटा कायम राहिल्यास पेट्रोल आणि डिझेलचे दर आणखी वाढण्याची शक्यता आहे. यामुळे केंद्र सरकारपुढे मोठं आव्हान उभे राहिले आहे. परिस्थिती बदलली नाही तर हे संकट अजूनच गडद होण्याची शक्यता नाकारता येत नाही.