डिजेवर नाचताना लागला धक्का, रागातून त्याने पोटातच खुपसला चाकू ; संभाजीनगर येथील घटनेने उडाली खळबळ….!


संभाजीनगर : डीजेच्या गाण्यावर नाचताना धक्का लागल्याच्या कारणावरून वाद झाल्याची घटना समोर आली आहे. वाद एवढा विकोपाला गेला की, थेट एकाच्या पोटात चाकू खुपसल्याची घटना समोर आली आहे. ज्यात एक 21 वर्षीय तरुण जखमी झाला आहे.

संभाजीनगर शहरातील पडेगाव पोलीस कॉलनी येथे ही घटना घडली असून, या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विकास जनार्धन भडके असे जखमी तरुणाचे नाव असून, सूरज भुजबळ असे चाकू मारणाऱ्या आरोपीचे नाव आहे.

7 मे रोजी विकासचा मित्र विक्की बोराडे याचा पडेगावच्या पोलीस कॉलनी येथे हळदीचं कार्यक्रम होता. यासाठी विकास भाऊ आकाश भडके व मित्र सागर जंगळे, इजाज यांच्यासोबत हळदीच्या कार्यक्रमाला गेला होता.

दरम्यान या कार्यक्रमाच्या ठिकाणी डीजे लावण्यात आला होता. याचवेळी नाचत असतांना विकासाचा भाऊ आकाश याचा त्याच्या ओळखीच्या सुरज भुजबळला धक्का लागला. त्यामुळे आकाश व सुरज भुजबळ यांच्या दोघांमध्ये भांडणे झाले.

याचवेळी मी आज तुला जिवंत सोडणार नाही, असे म्हणुन सुरजने त्याच्याकडे असलेला चाकु काढला व विकासच्या डाव्या बाजुला पोटात खुपसला. ज्यात तो गंभीर जखमी झाला. यामुळे मोठा गोंधळ उडाला.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!