किरकोळ कारणावरून लोणी काळभोर येथे दोघांवर चाकूने वार ; हडपसर येथील तरुणावर गुन्हा दाखल..!

लोणी काळभोर, (पुणे) : मित्राला मारहाण का करता असे विचारले असता दोघांवर एकाने चाकूने वार केल्याची घटना घडली आहे. हि घटना सोमवारी (ता. ०१) पहाटे अडीच वाजण्याच्या सुमारास लोणी काळभोर (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील राजेंद्र पेट्रोल पंपाजवळ घडली आहे. याप्रकरणी हडपसर येथील एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

संतोष बाजीराव इसावे (रा. हडपसर) याच्यावर असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे, तर याप्रकरणी निखील सुदाम विरकर (वय २३, रा. लोणी काळभोर) यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार, निखील विरकर व त्यांचा मित्र कान्हा काळभोर हे पेट्रोल भरण्यासाठी पंपावर गेले. त्यावेळी बोलत असताना गणेश काळभोर हा तेथे पळत आला. आरोपी त्याला मारहाण करीत असल्याचे सांगून मला वाचवा, असे तो म्हणाला. कान्हा याने त्याला तुम्ही गणेशला का मारहाण करीत आहे. अशी विचारणा केली.

त्यानंतर आरोपीने त्याला तुला आमचे काय करायचे आहे तू आमच्यामध्ये पडू नको, नाही तर तुलासुद्धा सोडणार नाही अशी धमकी दिली. त्यावेळी विरकर यांनी त्याला तुम्ही त्याला मारु नका, आम्ही त्याला घरी सोडतो, असे सांगितले.

दरम्यान संतोष याला राग येऊन त्याने व त्याच्या सोन्या साथीदाराने फिर्यादीला मारहाण करायला सुरुवात केली.कान्हा हा मदतीला आल्यावर त्याने लय माज आला आहे. मी टिपू पठाणचा नंबरकारी आहे. मला हडपसरचा भाई संतोष विसावे म्हणतात, अशी धमकीदिली.
त्यानंतर त्याच्या साथीदार सोन्या याला यांना सोडायचे नाही, असे म्हणून जॅकेटमधून चाकू काढून फिर्यादी व कान्हा यांच्या गालावर, डाव्या बाजूला, गळ्यावर वार करुन गंभीर जखमी केले. त्यानंतर ते दोघे पळून गेले. त्यानंतर मंगळवारी (ता. ०९) तक्रार दिली असून या घटनेचा पुढील तपास पोलीस करीत आहेत.