सोनं ₹8,779 ने, चांदी ₹21,983 ने महागली; दरांचा मोठा स्फोट, सोनं ₹1.65 लाखांवर


घरगुती गुंतवणुकीचा सर्वात सुरक्षित पर्याय मानल्या जाणाऱ्या सोनं-चांदीच्या दरांनी अचानक मोठी उसळी घेत बाजारात खळबळ उडवली आहे. काही दिवसांतच झालेल्या या झपाट्याच्या वाढीमुळे ग्राहक अक्षरशः धक्का बसल्यासारखी प्रतिक्रिया देत आहेत.

केंद्र सरकारने सोने आणि चांदीवरील आयात शुल्क वाढवल्यानंतर बाजारात थेट परिणाम दिसून आला आहे. 24 कॅरेट सोन्याच्या दरात तब्बल ₹8,779 ची वाढ झाली आहे. 22 कॅरेट सोनं ₹8,042 ने आणि 18 कॅरेट सोनं ₹6,584 ने महागले आहे. त्यामुळे सोन्याचा दर 10 ग्रॅमसाठी ₹1,65,000 पर्यंत पोहोचला आहे.

दुसरीकडे चांदीच्या दरातही मोठी उसळी दिसून आली असून प्रति किलो चांदी ₹21,983 ने महागली आहे. त्यामुळे चांदीचा दर आता सुमारे ₹2,95,455 प्रति किलो इतका झाला आहे. या वाढीमुळे सराफा बाजारात अस्थिरता निर्माण झाली असून गुंतवणूकदारांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे.

तज्ज्ञांच्या मते, आयात शुल्क वाढल्यामुळे परदेशातून येणारा पुरवठा महाग झाला असून त्याचा थेट परिणाम देशांतर्गत बाजारावर झाला आहे. पुढील काही दिवस दरात चढ-उतार कायम राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!