मोठी बातमी! काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांची तब्येत बिघडली; गुरुग्राम येथील मेदांता रुग्णालयात दाखल…


नवी दिल्ली : काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधी यांची प्रकृती अचानक बिघडल्याने त्यांना गुरुग्राम येथील मेदांता रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सध्या त्यांच्यावर डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार सुरू असून त्यांच्या प्रकृतीबाबत काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सोनिया गांधी यांना किरकोळ शस्त्रक्रियेसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे सांगितले जात आहे. मात्र, ही शस्त्रक्रिया नेमकी कशासाठी करण्यात येणार आहे, याबाबत अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाही. रुग्णालयातील डॉक्टरांचे पथक त्यांच्या प्रकृतीवर बारकाईने लक्ष ठेवून आहे.

दरम्यान, त्यांच्या प्रकृतीबाबतची बातमी समोर येताच काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये चिंता व्यक्त केली जात असून पक्षाकडून अधिकृत निवेदन येण्याची शक्यता आहे. काही वृत्तांनुसार, त्यांची प्रकृती स्थिर असल्याचेही सांगण्यात येत आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!