‘उरुळी कांचन’ उद्या महसूलचा ‘छत्रपती शिवाजी महाराज ‘महाराजस्व समाधान शिबीर कार्यक्रम; महसूलचे प्रलंबित प्रश्न एकाछताखाली सोडविणार…


उरुळी कांचन:  महाराष्ट्र शासनाच्या ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानांतर्गत’ उरुळी कांचन येथे शुक्रवार दिनांक ०८ मे २०२६ रोजी ‘समाधान शिबिराचे’ आयोजन करण्यात आले आहे. सर्वसामान्य जनता, शेतकरी, विद्यार्थी आणि महिलांचे शासकीय विभागांशी संबंधित दैनंदिन प्रश्न,उपविभागीय अधिकारी डॉ.यशवंत माने यांच्या मार्गदर्शनाखाली व सर्व विभाग प्रमुखांच्या उपस्थितीत निकाली काढले जाणार असल्याची माहिती जिल्हा परिषद समाज कल्याण सभापती जितेंद्र बडेकर यांनी दिली आहे.

सदरचे हे शिबीर कस्तुरी मंगल कार्यालय पुणे सोलापूर रोड,उरुळी कांचन येथे आयोजित करण्यात आले असून, या ठिकाणी महसूल,पोलीस,कृषी,आरोग्य,भूमी अभिलेख,पाटबंधारे आणि महावितरण यांसारख्या विविध विभागांचे अधिकारी लाभार्थ्यांच्या यादीसह उपस्थित राहणार आहेत. शिबीरात लाभ मिळणाच्या योजना – घरकुल योजना लाभ देणे – रेशनिंग धान्य पुरवठा सुरू करणे – जातीचा दाखला – उत्पन्नाचा दाखला – रहिवासी दाखला- ग्रामपंचायत घरपट्टी, पाणीपट्टी समस्या – तुकडेबंदी नियमितीकरण करणे – वर्ग २ च्या जमीन वर्ग १ प्रकरणे – भूसंपादन कमी जास्त पत्रक – अकृषिक-कमी जास्त पत्रक – अकृषित तरतुदीची सुधाररणानुसार अधिमुल्य आकारणी व वसुली करणे.- तुकडेबंदी कायद्याच्या उलुंघनाबाबतच्या प्रकरणांचा निपटारा.- महावितरण बाबत शेतकरी बांधवांच्या समस्या – संजय गांधी निराधार योजना – दिव्यांग योजना- PM किसान योजना – नमो किसान योजना- कृषी विभाग योजना – आरोग्य विषयक समस्या – मुख्यमंत्री शेत-पानंद रस्ते योजना – ॲग्रीस्टॅक आय डी काढणे – ई-मोजणी (मोजणीची प्रलंबित प्रकरणे)- ७/१२ मधील चुकांची दुरुस्ती – प्रलंबित फेरफार.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!