प्रेमविवाहाचा अनुभव नसल्याने नरेंद्र मोदींना लव्ह जिहाद…!! प्रकाश आंबेडकर यांचे मोठे वक्तव्य…!

मुंबई : द केरला स्टोरी या चित्रपटाला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पाठिंबा दिल्यानंतर राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया येत आहेत. सध्या या चित्रपटाची सगळीकडे चर्चा सुरू आहे.

यावर आता वंचित बहुजन पक्षाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना टोला लगावला आहे. प्रकाश आंबेडकर म्हणाले, मी ‘द केरला स्टोरी’सारखे चित्रपट कधीच बघत नाही. या चित्रपटाच्या प्रसिध्दीसाठी राजकीय वाद निर्माण केला जात आहे.
मी ‘द केरला स्टोरी’ सारखे चित्रपट कधीच बघत नाही. पंतप्रधान मोदींना प्रेमविवाहाचा अनुभव नसल्याने लव्ह जिहादची माहिती नाही. काही जण ठरवून लग्न करतात, तर काही जण प्रेमविवाह करतात.

प्रेमविवाह करताना जात, धर्म बघितला जात नाही. मात्र, पंतप्रधान मोदींना याचा अनुभव नसल्याने त्यांना लव्ह जिहादची माहिती नाही, असा टोलाही प्रकाश आंबेडकरांनी लगावला आहे. आता भाजप काय उत्तर देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
केरळ हे देशातले सुंदर राज्य आहे. केरळमधील लोक खूप परिश्रमी आणि प्रतिभावान आहेत. पण त्याच केरळमध्ये सुरू असणा-या दहशतवादी कटाचा खुलासा या चित्रपटाने केला आहे.
कर्नाटकमध्ये बोलताना मोदींनी दहशतवादी कट असलेल्या कथानकावर आधारित ‘द केरला स्टोरी’ या चित्रपटाला पाठिंबा दिला होता. हा चित्रपट अनेक अंगाने वादात सापडला आहे.