राज्य महिला आयोग अध्यक्षपदी माजी IPS अधिकारी मीरा बोरवणकर यांची निवड?; नवी माहिती समोर आली


पुणे : अशोक खरात प्रकरणात नाव समोर आल्यामुळे रुपाली चाकणकर यांना राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. महिला आयोगाच्या अध्यक्षपदी कुणाची निवड होणार, याबद्दल तर्कवितर्क लढवले जात आहे.

अशातच माजी आयपीएस अधिकारी मीरा बोरवणकर यांची निवड झाल्याचं वृत्त समोर आलं होतं. पण, बोरवणकर यांची अशी कोणतीही निवड झाली नाही, असं स्पष्ट करण्यात आलं आहे. सरकारकडून किंवा अधिकृत सूत्रांकडून या बातमीला दुजोरा देण्यात आलेला नाही.

त्यामुळे ही माहिती खोटी किंवा दिशाभूल करणारी असल्याचं सांगण्यात येत आहे.राज्य महिला आयोगाचे अध्यक्षपद सध्या रिक्त असून, या पदावर नव्या नियुक्तीबाबत चर्चा सुरू असल्याचं समजतं. विविध सामाजिक कार्यकर्ते आणि राजकीय नेते यांनी या पदासाठी योग्य व्यक्तीची निवड व्हावी अशी मागणी केली आहे.

दरम्यान, राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी निवृत्त आयपीएस अधिकारी मीरा बोरवणकर यांची महिला आयोगाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करावी अशी मागणी केली होती. “महिलांचे हक्क, सुरक्षा आणि प्रतिष्ठा जपण्याच्या दृष्टीने महिला आयोग अत्यंत महत्त्वाचे कार्य करू शकतो. महिला आयोगाचे अध्यक्षपद हे एक संवैधानिक, कायदेशीर पद आहे जे महिलांवरील अन्याय दूर करण्यासाठी थेट हस्तक्षेप करू शकते.

महिलांवरील अत्याचाराच्या प्रकरणांमध्ये ‘सुमोटो’ अर्थात स्वतःहून दखल घेण्याचा अधिकार महिला आयोगाच्या अध्यक्षांना आहे. मीरा बोरवणकर यांची आतापर्यंतची कारकीर्द पाहता महिला आयोगाच्या अध्यक्षपदी त्यांचा विचार करावा, अशी मागणी अनेक नेत्यांनी लावून धरली होती.

राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी अनेकदा महिला आयोगाच्या अध्यक्षपदासाठी मीरा बोरवणकर यांचे नाव सुचवले आहे. तसंच, निवृत्त आयएएस मेधा गाडगीळ आणि सामाजिक कार्यकर्त्या वर्षा देशपांडे आणि मनीषा गुप्ते यांच्यासारख्या अनुभवी व्यक्तींना संधी द्यावी, असंही रोहित पवार म्हणाले होते.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!