सांगलीत धक्कादायक प्रकार! पाळीव कुत्र्याचा हल्ला; डॉक्टर अडचणीत, नेमकं काय घडलं?


सांगली : शहरातील विश्रामबाग परिसरात एक धक्कादायक घटना घडली आहे. इस्त्रीचे कपडे आणण्यासाठी गेलेल्या व्यक्तीवर पाळीव कुत्र्याने हल्ला केल्याची घटना समोर आली आहे. या हल्ल्यात ५७ वर्षीय सरफराज अब्दुल्ला शहा जखमी झाले आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १ मे रोजी रात्री साडेआठच्या सुमारास शहा हे डॉक्टरांच्या घरी कपडे आणण्यासाठी गेले होते. यावेळी घरासमोर कुत्रा मोकळा सोडलेला होता. शहा घरात प्रवेश करताच कुत्र्याने अचानक त्यांच्यावर झडप घातली.

या हल्ल्यात ते जखमी झाले असून त्यांच्यावर तातडीने उपचार करण्यात आले. उपचारानंतर त्यांनी विश्रामबाग पोलीस ठाणे येथे तक्रार दाखल केली. तक्रारीनुसार संबंधित डॉक्टरांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान, या घटनेनंतर पाळीव प्राणी ठेवताना आवश्यक ती खबरदारी घेणे किती महत्त्वाचे आहे, हे पुन्हा अधोरेखित झाले आहे. नागरिकांच्या सुरक्षेसाठी पाळीव प्राणी नियंत्रणात ठेवण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!