नसरापूर हादरले! चिमुरडीच्या तोंडात मोजा कोंबून क्रूर हत्या; शवविच्छेदन अहवालातून धक्कादायक खुलासा..


नसरापूर : पुणे जिल्ह्यातील नसरापूर येथे चार वर्षांच्या चिमुकलीवर झालेल्या अत्याचार व हत्येच्या घटनेने संपूर्ण राज्य हादरले आहे. या अमानुष प्रकारामुळे संतापाची लाट उसळली असून सर्वत्र निषेध व्यक्त केला जात आहे.

तपासादरम्यान ससून रुग्णालय प्रशासनाने पोलिसांना दिलेल्या प्राथमिक शवविच्छेदन अहवालातून धक्कादायक माहिती समोर आली आहे. आरोपीने गुन्हा लपवण्यासाठी आणि मुलीचा आवाज थांबवण्यासाठी अत्यंत क्रूर पद्धतीचा अवलंब केल्याचे निष्पन्न झाले आहे.

अहवालानुसार, पीडित मुलीच्या शरीरावर, विशेषतः छातीवर मारहाणीच्या खुणा आढळून आल्या आहेत. या प्रकरणात केवळ अत्याचारच नव्हे, तर निर्दयीपणे हत्या करण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे. या उघडकीनंतर तपास यंत्रणांवर आरोपीविरुद्ध भक्कम पुरावे गोळा करण्याचा दबाव वाढला आहे.

दरम्यान, या घटनेचे पडसाद सोलापूर शहरातही उमटले आहेत. मोठ्या संख्येने नागरिक रस्त्यावर उतरले असून चौपाड परिसरात निषेध नोंदवण्यात आला. त्यानंतर विठ्ठल मंदिर परिसरातून नवी पेठ मार्गे कॅण्डल मार्च काढण्यात आला.

या मोर्चात सहभागी नागरिकांनी आरोपीला कठोरात कठोर शिक्षा देण्याची मागणी केली आहे. तसेच महिलांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला असून, पीडितेला न्याय मिळावा यासाठी विविध संघटनांकडून निदर्शने करण्यात येत आहेत.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!