बारामतीत मोठा कांड! सुनेत्रा पवारांविरोधातील २२ उमेदवार अडचणीत; गुन्हे दाखल होण्याची शक्यता, नेमकं काय प्रकरण?

बारामती : बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मोठी खळबळ उडाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांच्या विरोधात उभ्या असलेल्या उमेदवारांपैकी तब्बल २२ जणांच्या नामनिर्देशन अर्जांवर बोगस सह्यांचा संशय व्यक्त करण्यात आला आहे.

प्राथमिक छाननीदरम्यान २२ पैकी सुमारे १२ ते १३ उमेदवारांच्या अर्जांवरील सूचक आणि अनुमोदकांच्या सह्यांमध्ये तफावत आढळून आली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, काही सह्या संबंधित व्यक्तींनी केल्याच नसून त्या बनावट असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
निवडणूक अर्ज दाखल करताना स्थानिक मतदारांच्या सूचक व अनुमोदकांच्या स्वाक्षऱ्या अनिवार्य असतात. अशा परिस्थितीत बोगस सह्या आढळणे हा गंभीर प्रकार मानला जातो.

निवडणूक नियमांनुसार, कोणत्याही उमेदवाराला आपला अर्ज दाखल करताना स्थानिक मतदारांपैकी सूचक आणि अनुमोदकांच्या स्वाक्षऱ्या घेणे अनिवार्य असतं. बारामती पोटनिवडणुकीसाठी अनेक अपक्ष आणि इतर उमेदवारांनी आपले अर्ज दाखल केले होते.

मात्र, निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे झालेल्या छाननी दरम्यान २२ उमेदवारांपैकी १२ ते १३ उमेदवारांच्या अर्जांवर असलेल्या सूचक-अनुमोदकांच्या सह्यांमध्ये तफावत असल्याचं आढळलं आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, यातील बऱ्याच अर्जांवरील सह्या या संबंधित व्यक्तींनी केल्याच नसून त्या ‘बोगस’ पद्धतीने केल्याचं समोर आलं आहे.
निवडणूक प्रक्रियेत खोटी कागदपत्रे किंवा बोगस स्वाक्षऱ्या सादर करणे हा गंभीर स्वरूपाचा गुन्हा मानला जातो. यामुळे निवडणूक प्रशासन सतर्क झालं असून, ज्या उमेदवारांनी अशा प्रकारे दिशाभूल केली आहे, त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याची तयारी सुरू असल्याची माहिती मिळाली आहे.