पुणे जिल्हा हादरला! भोरनंतर चाकणमध्ये ३ वर्षाच्या चिमुकल्यावर लैंगिक अत्याचार करून हत्या, १६ वर्षीय अल्पवयीन ताब्यात


पुणे : पुणे जिल्ह्यातील भोर येथील घटनेनंतर आता आणखी एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. चाकण परिसरात घडलेल्या या संतापजनक घटनेने संपूर्ण परिसर हादरला आहे.

म्हाळुंगे दक्षिण पोलीस ठाण्याच्या हद्दीत तीन वर्षांच्या चिमुकल्यावर लैंगिक अत्याचार करून त्याची निर्घृण हत्या करण्यात आल्याची माहिती उघडकीस आली आहे. या घटनेमुळे नागरिकांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली असून कायदा-सुव्यवस्थेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत.

प्राथमिक माहितीनुसार, या प्रकरणात १६ वर्षीय अल्पवयीन मुलाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. आरोपी मूळचा बिहार राज्यातील असल्याचे समजते. मृत बालकाचे कुटुंब मध्य प्रदेशातील असून रोजगाराच्या निमित्ताने चाकण परिसरात वास्तव्यास होते.

घटनेनंतर पोलिसांनी तत्काळ कारवाई करत संशयिताला अटक केली असून त्याच्याकडून सखोल चौकशी सुरू आहे.

दरम्यान, काही दिवसांपूर्वीच पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील नसरापूर येथे चार वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार करून तिची हत्या करण्यात आली होती. त्या घटनेची धग अद्याप शांत झालेली नसतानाच चाकणमधील ही नवीन घटना समोर आल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

सदर प्रकरणाचा पोलीस सखोल तपास करत असून आरोपीवर कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!