कार खरेदीच्या नावाखाली पावणे पाच कोटी रुपयांचा गंडा; सोरतापवाडी येथील शिवमोटर्स कार विक्रेता एजंटवर फसवणूकीचा गुन्हा दाखल….


उरुळी कांचन : उरुळी कांचन परिसरात कार व्यवहाराच्या नावाखाली विश्वासघात करून लाखो रुपयांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार उघडीस आला आहे. या प्रकरणी सोरतापवाडी येथील “शिव मोटर्स”च्या मालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणी महादेव विठ्ठल जरांडे (रा.स्वरगंधार सोसायटी उरुळी कांचन ता. हवेली जि. पुणे) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच याप्रकणी चांद नबी शेख वय 34 वर्ष, रा. सरकार नगर स्टेशन रोड अकसा मशीद शेजारी यवत तालुका दौंड) यांनी फिर्याद दिली आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, फिर्यादी चांद शेख यांनी सोरतापवाडी येथील ‘शिव मोटर्स’मध्ये जाऊन मारुती सुझुकी सेलेरिओ (MH 12 PN 1416) ही कार खरेदीसाठी पसंत केली होती. मालक महादेव विठ्ठल जरांडे याने कारची किंमत ₹3.70 लाख ठरवली होती. त्यानुसार शेख यांनी ₹2 लाख रोख व ऑनलाइन स्वरूपात रक्कम दिली.

यानंतर कारवर घेतलेल्या सुमारे ₹2.5 लाखांच्या कर्जाची रक्कम आरोपीने स्वतःच्या खात्यावर वळवून घेतल्याचा आरोप आहे. उरलेले ₹80 हजार रुपये परत देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, दिलेले ₹80 हजार व त्यानंतर दिलेले ₹1.5 लाखांचे चेक बँकेत वारंवार बाऊन्स झाले.

दरम्यान, कारचे मूळ मालक अनंता सुनील पवार यांनी शेख यांना सांगितले की, ही कार त्यांनी फक्त विक्रीसाठी जरांडेकडे दिली होती, मात्र कोणतीही रक्कम न मिळाल्याने ती परत घेऊन गेले. त्यामुळे फिर्यादीकडे ना कार राहिली ना पैसे.

या संपूर्ण व्यवहारात ₹4,50,000 रोख व ऑनलाइन रक्कम तसेच कार कर्जाचे 4 हप्ते मिळून ₹37,228 असे एकूण ₹4,87,228 रुपये हडप केल्याचा आरोप करण्यात आला आहे.

याशिवाय कोरेगाव मूळ येथील मेहबूब मदारसे यांच्यासह इतरांचीही अशाच प्रकारे फसवणूक झाल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अनिल खोमणे करीत आहेत.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!