दलितवस्ती सुधारणा निधी कायदोपत्री दाखवू लाटल्यास कारवाई; सभापती जितेंद्र बडेकर यांनी जिल्ह्यातील गटविकास अधिकारी यांना काढले पत्र….


पुणे : पुणे जिल्हा परिषद समाजकल्याण विभागाने अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या वस्ती विकास योजनांतील कामे संबंधित वस्त्यांमध्येच करण्यात यावीत, असे स्पष्ट निर्देश दिले आहेत. हे निर्देश जर ग्रामपंचायत स्तरावर पाळले गेले नाहीतर संबंधित प्रकरणात ग्रामविकास अधिकारी यांना दोषी धरण्यात येऊन कारवाई संकेत जिल्हा परिषदेचे समाजकल्याण सभापती जितेंद्र बडेकर यांनी दिले आहे.

जिल्हा परिषदेच्या दलित वस्ती सुधारणा निधीतून दलित वस्ती सुधारणांसाठी विविध स्वरुपाचा निधी देण्यात येतो. परंतु हा निधी बोगस कायदपत्रे दाखवून अन्य ठिकाणी खर्च होत असल्याची तक्रारी प्राप्त झाल्या आहेत.

या अनुशंगाने जिल्हा परिषदेचे समाजकल्याण समितीचे सभापती जितेंद्र बडेकर यांनी आता जिल्ह्यात गटविकास अधिकाऱ्यांना पत्र काढीत दलित वस्ती सुधारणेचा निधी अन्यत्र वापल्यास संबंधित ग्रामविकास अधिकारी व ग्रामसेवक यांना जबाबदार धरीत कारवाईचे पत्र जारी केले आहे.

या पत्रात नमूद करण्यात आले आहे की, वस्ती विकास योजनेअंतर्गत मंजूर कामे वस्तीबाहेर केल्याचे आढळल्यास संबंधित ग्रामपंचायत अधिकारी व शाखा अभियंत्यांवर जबाबदारी निश्चित करून प्रशासकीय कारवाई करण्यात येईल.

तसेच, लोकप्रतिनिधी किंवा नागरिकांकडून तक्रारी प्राप्त झाल्यासही संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई केली जाणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. या निर्णयामुळे योजना निधीचा योग्य वापर होऊन लाभार्थी वस्त्यांमध्येच प्रत्यक्ष विकास कामे होण्यास चालना मिळणार आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!