मित्रांसोबत पोहायला गेला आणि परतलाच नाही ! लोणी काळभोर हद्दीतील नवीन उजवा मुठा कालव्यात बारामतीचा तरुण बुडाला..!

लोणी काळभोर : लोणी काळभोर येथे राहत असलेल्या आजी आजोबांना भेटण्यासाठी आलेल्या बारामती येथील बावीस वर्षीय युवकाचा मुळा मुठा कालव्यात वाहून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. हि घटना रामदरा परिसरात रविवारी (ता. .०७) दुपारी साडे तीनच्या दरम्यान घडली आहे.
झहीर समिर सय्यद (अंदाजे वय – २२ मु. पो. बारामती, फलटण नाका, निलम पेलेस) असे बुडून मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, झहीर हा भारत फोर्स या नामांकित कंपनीत कामाला होता. झहीर सय्यदचे आजी आजोबा लोणी काळभोर ग्रामपंचायत हद्दीतील इनामदार वस्ती या परिसरात राहतात. रविवारी (ता.७) रामदरा परिसराकडे जाणाऱ्या मुळा मुठा कालव्यात मित्रांसोबत झहीर पोहण्यासाठी गेला होता.
यावेळी झहीरने कालव्यात उडी मारल्यावर त्याला पाण्याचा अंदाज न आल्याने पाण्याच्या वरती येऊ शकला नाही. त्याची सर्वत्र शोधाशोध केली असता कोठेही दिसून आला नाही.
दरम्यान, सोमवारी (ता. ०८) सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास त्याचा मृतदेह हा लोणी काळभोर हद्दीतच वाहून जाताना दिसून आला. यावेळी लोणी काळभोर पोलीस, लोणी काळभोर ग्रामस्थांनी मृतदेह बाहेर काढला. लोणी काळभोर पोलिसांनी पंचनामा करून पुढील कारवाई सुरु केली आहे.