बाळूमामाचा अवतार सांगून महिलेसोबत नको ते कृत्य, मनोहर मामाचे हादरवणारे कांड, आता हादरवणारी माहिती समोर…

सोलापूर : सध्या भोंदूबाबा अशोक खरात प्रकरण राज्यात चर्चेत आहेत. अनेक महिलांसोबतचे व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर मोठी खळबळ उडाली होती. असे असताना आता स्वतःला बाळूमामाचा अवतार म्हणवून घेणारा आणि भविष्य बदलवण्याचे आमिष दाखवत भक्तांची फसवणूक करणारा स्वयंघोषित अध्यात्मिक गुरु मनोहर भोसले उर्फ मनोहर मामा याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.

सोलापूर पोलिसांनी ही कारवाई केली आहे. मनोहर भोसले याला या आधी देखील आर्थिक फसवणूक, भोंदूगिरीसह बलात्कार सारखे गंभीर गुन्हे दाखल आहेत. 3 गुन्ह्यात जामीनावर असलेला मनोहर मामा पुन्हा एकदा आर्थिक फसवणूक प्रकरणात पोलिसांच्या कोठडीत आहे. यामुळे सध्या तपास सुरू आहे.
पाच वर्षांपूर्वी एका महिलेने मनोहर भोसले याने अत्याचार केल्याची तक्रार दिली. सिरीयलमध्ये काम मिळवून देतो असे आमिष दाखवून मनोहर भोसले याने पीडित महिलेवर शारीरिक संबंध ठेवले. तसेच तीची आर्थिक फसवणूक ही केली. या महिलेच्या तक्रारीवरून सोलापूरच्या करमाळा पोलिसांत भोसले विरोधात गुन्हा नोंद झाला.

यामध्ये त्याला अटक ही झाली होती. काही महिने त्याने तुरुंगवास ही भोगला. मात्र त्यानंतर तो या प्रकरणात जामीनावर बाहेर आहे. आता एका तरुण रियल इस्टेट व्यावसायिकांची आर्थिक फसवणूक केल्याचा आरोप मनोहर भोसलेवर आहे. एका पूजेसाठी दोन लाख रुपये खर्च असून 50 हजर रुपये तात्काळ भरण्यासाठी सांगितलं.

दरम्यान, करमाळा येथील निभोरे गावात मठात एका व्यक्तीला हे पैसे देण्यासाठी सांगितले असता तक्रारदाराने विश्वास ठेवत 50 हजर रुपये संबंधित व्यक्तीला दिले. मात्र त्यानंतर संबंधित व्यक्तीने फोन बंद केला. मनोहर मामाने देखील कोणताही संपर्क केला नाही.