पुणे- मुंबई प्रवास आता एक तासांनी होणार कमी ! मिसिंग लिंक प्रकल्पाचे काम शेवटच्या टप्प्यात…


पुणे : पुणे मुंबई प्रवास करणारांची सध्या मोठी आहे. दिवसेंदिवस हा आकडा वाढतच आहे. असे असताना आता राज्य रस्ते विकास महामंडळाच्या माध्यमातून पुणे ते मुंबईचा प्रवास गतिमान करण्यासाठी घाट सेक्शन मध्ये मिसिंग लिंक तयार केला जात आहे.

या मिसिंग लिंक प्रकल्पाचे काम सध्या वेगाने सुरू असून आत्तापर्यंत 72 टक्के काम पूर्ण झाले आहे. या प्रकल्पांतर्गत आठ किलोमीटरचे दोन बोगदे तयार केले जात आहेत तसेच एक दरीपूल म्हणजेच व्हायडक्ट तयार करण्याचे नियोजन आहे. यामुळे अंतर कमी होणार आहे.

यापैकी बोगद्याचे खोदकाम पूर्ण झाले असून व्हायडक्टचे काम देखील युद्धपातळीवर सुरू आहे. या प्रकल्पाचे संपूर्ण काम पूर्ण करण्यासाठी आणखी पाच ते सहा महिन्यांचा कालावधी लागणार आहे. अर्थातच पुढील वर्षी मार्च महिन्यापासून हा मिसिंग लिंक प्रकल्प वाहतुकीसाठी खुला होऊ शकतो, असे म्हटले जात आहे.

सध्या बोगद्याची खोदकामे पूर्ण झाली असून, बोगद्यांतील रस्ते बांधण्याचे काम सध्या सुरू आहे. दोन पुलांपैकी एका पुलाचे काम पूर्ण झाले आहे. या दरीपुलाची उंची १८० मीटर असून, लांबी ५५० मीटर एवढी आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!