गुंगीचे औषध पाजून महिलेवर अत्याचार करणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यावर गुन्हा दाखल…!

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्याने एका महिलेला गुंगीचे औषध पाजून अअत्याचारनैसर्गिक केल्याची धक्कादायक घटना छत्रपती संभाजीनगर शहरातून समोर आली आहे. याप्रकणी एका 33 वर्षीय महिलेने सिटी चौक पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

मुख्तार खान उर्फ बब्बु (वय 42 वर्ष, रा. नूर कॉलनी, टाऊन हॉल परिसर) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. तो राष्ट्रवादी काँग्रेसचा माजी पदाधिकारी आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार, फिर्यादी पीडित महिला रस्त्याने येत जात असताना आरोपी मुख्तार आक्षेपार्ह कपडे घालून तिला अश्लील हातवारे करायचा. त्याच्याकडे पीडितेने दुर्लक्ष केल्यावर आरोपीने तिचा पाठलाग करायला सुरवात केली.

त्यानंतर महिलेला गाठून तिच्या मुलांचे अपहरण व पतीला मारहाण करणे व तिच्याबद्दल चुकीची माहिती देऊन संसार उद्ध्वस्त करण्याची धमकी दिली. या प्रकाराला कंटाळून विवाहितेला आरोपीने भेटण्यासाठी घरी येण्यास भाग पाडले.
दरम्यान पिडीत महिला जेव्हा घरी आली तेव्हा तिला मुख्तार याने तिला पिण्याच्या पाण्यात गुंगीचे औषध टाकून प्यायला दिले. पाणी पिल्यावर महिला काही वेळाने अचानक बेशुद्ध झाली. त्याच अवस्थेत मुख्तार खानने पीडितेवर अनैसर्गिक अत्याचार केले.
धक्कादायक म्हणजे अत्याचार करतानाचा व्हिडीओ बनविला. तर पीडिता शुद्धीवर आल्यानंतर या कृत्याबाबत कोणाला काही सांगितले तर तुझा अश्लील व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करेन, अशी धमकी दिली.
