धक्कादायक! राज्यात एका महिन्यात 2200 मुली बेपत्ता, सर्वाधिक आकडा पुण्याचा…

पुणे : सध्या दररोज १८ ते २५ या वयोगटातील ७० मुली बेपत्ता होत असल्याची आकडेवारी समोर आली आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. हा आकडा खूपच मोठा आहे. तसेच मार्च या एकाच महिन्यात तब्बल २२०० मुली बेपत्ता झाल्या आहेत.

यामुळे पोलीस प्रशासन नेमकं काय करतंय असा प्रश्न निर्माण होत आहे. पुणे, नाशिक, मुंबई, ठाणे या भागातून सर्वाधिक मुली बेपत्ता होत आहेत. अनेक मुलींचा पुन्हा तपास लागत नाही.
फेब्रुवारी महिन्याच्या आकडेवारीपेक्षा मार्च महिन्यातील आकडेवारी ही ३०७ ने अधिक असल्याचही आकडेवारीतून स्पष्ट झालं आहे. यामुळे पालकांची भीती वाढली आहे. नागपूर येथे नुकताच राज्य महिला आयोगाचा हा कार्यक्रम पार पडला.

दरम्यान, सातत्याने हरवलेल्या मुलींच्या संदर्भात प्रत्येक पोलीस स्टेशनमधील बुकींग सेल कडेही पाठपुरावा केला जातो. ही आकडेवारी अत्यंत गंभीर आहे. राज्याच्या गृहविभागाने यात लक्ष घालणं अत्यंत महत्त्वाचे आहे
