गोरेगाव नेस्को ड्रग्ज प्रकरणात महत्वाची अपडेट!ड्रग्सच्या सहा ते सात टॅबलेट जप्त, आतापर्यंत सहा आरोपींना अटक..

मुंबई :मुंबईतील गोरेगाव येथील नेस्को एक्झिबिशन सेंटरमध्ये आयोजित एका लेट-नाईट टेक्नो म्युझिक कॉन्सर्टमध्ये तिघांपैकी दोघांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली होती. त्यापैकी एक जण रुग्णालयात उपचार घेत आहे. आता याबाबत महत्वाची माहिती समोर आली आहे.पोलिसांनी याप्रकरणी सहा आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत.तसेच आरोपींकडून एकूण सहा ते सात ड्रग्सच्या टॅबलेट्स जप्त केल्या आहेत.

गोरेगाव पूर्वेकडील नेस्को एक्झिबिशन सेंटरमध्ये 11 तारखेला म्युझिक कॉन्सर्टचे आयोजन करण्यात आले होते. हा कार्यक्रम नेस्कोच्या पाच नंबर हॉलमध्ये पार पडला. या कॉन्सर्टसाठी प्रत्येकी दोन हजार रुपयांची एन्ट्री फी आकारण्यात आली होती.ड्रग्स घेतलेल्या तिघांपैकी दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला असून शीतल नावाची विद्यार्थिनी सध्या रुग्णालयात उपचार घेत आहे. तपासा दरम्यान आरोपींपैकी एकाने कार्यक्रमस्थळी ड्रग्स आणल्याचे समोर आले आहे.
अटक करण्यात आलेल्यांमध्ये दोन नेस्को सेंटरशी संबंधित, एक आयोजक, एक विद्यार्थी आणि एक सप्लायर यांचा समावेश आहे. पार्टी आयोजित करणारा मुख्य आरोपी नागपूरचा आहे. या प्रकरणात दोन विद्यार्थी आणि इतर आयोजकांना अटक करण्यात आली आहे. अटक केलेल्यांची नावे पुढील प्रमाणे-

1. विहान उर्फ आकाश सामल – आयोजक 2. सनी जैन – व्यवस्थापक, नेस्को सेंटर3. बालकृष्ण कुरुप – मुख्य सुरक्षा व्यवस्थापक, नेस्को 4. रौनक खंडेलवाल – ड्रग विक्रेता5. आनंद पटेल – ड्रग्ज विक्रेता6. प्रतीक पांडे – ड्रग्ज विक्रेता

या गोरेगावातील पार्टीसाठी उत्पादन शुल्क विभागाची परवानगी होती का? याची चौकशी सुरू आहे. वनराई पोलीस ठाण्याकडून या प्रकरणाचा संपूर्ण तपास वेगाने सुरू आहे.. या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या सर्व आरोपींना न्यायालयाने १६ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.