मुंबईत लाईव्ह म्युझिक कॉन्सर्टला गालबोट! ड्रग्जच्या ओव्हरडोसनं विद्यार्थ्यांचा मृत्यू ; 5 जणांना अटक


मुंबई : मुंबईतील लाईव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रगचा ओव्हरडोस झाल्याने दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला असल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या मृता मध्ये एक तरुण आणि एका तरुणीचा समावेश आहे. याप्रकरणी पोलिसांनी 5 जणांना अटक केली असून ड्रग्ज पुरवठ्याचा तपास सुरू आहे. या घटनेने संताप व्यक्त केला जात असून नाईट टेक्नो म्युझिक कॉन्सर्टला गालबोट लागला आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार, मुंबईतील गोरेगाव येथील नेस्को एक्झिबिशन सेंटर मध्ये आयोजित एका लेट-नाईट टेक्नो म्युझिक कॉन्सर्ट मध्ये उच्चशिक्षित एमबीए विद्यार्थ्यांचा अति अमली पदार्थाच्या सेवनामुळे मृत्यू झाल्याच समोर आला आहे. या प्रकारामुळे शहरात मोठी खळबळ उडाली असून ड्रग्जचे जाळे थेट कॉलेज विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचले आहे का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

या घटनेतील मृतांना नशिल्या पदार्थांचे सेवन करायला देण्यात आल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. या प्रकरणात आतापर्यंत 5 जणांना अटक करण्यात आली आहे. त्यामध्ये एका इव्हेंटशी संबंधित व्यक्तीचा समावेश आहे. नेस्कोचे व्हाइस प्रेसिडेंट यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या ड्रग्ज प्रकरणी वनराई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

ड्रग ओव्हरडोसने दोन जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली आहे. मृतांना नेमका कोणता ड्रग देण्यात आला आणि तो कोणी पुरवला, याबाबत अद्याप माहिती मिळाली नसून पोलिसांकडून या प्रकरणाचा शोध सुरू आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!