खरात भोवतीचा फास आवळणार! प्रतिभा चाकणकरांची तब्बल 8 तास पोलीस ठाण्यात चौकशी, केले गंभीर आरोप..


पुणे : महिलांचे लैंगिक शोषण आणि अत्याचार प्रकरणात अटकेत असलेला नाशिकचा भोंदू बाबा अशोक खरात करण्याची व्याप्ती भयानक वाढत चालली आहे. या प्रकरणानं अडचणीत आलेल्या रूपाली चाकणकर यांच्या भगिनी प्रतिभा चाकणकर यांची देखील कसून चौकशी केली जात आहे.आज त्यांची शिर्डी पोलिस ठाण्यात तब्बल आठ तास चौकशी झाली आहे. या चौकशी त्यांनी खरात वर गंभीर आरोप केले आहेत. त्यामुळे त्याच्या अडचणीत आता आणखीन वाढ झाली आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार, प्रतिभा चाकणकर यांची पोलीस ठाण्यातसमता पतसंस्थेत असलेल्या खात्यांसंदर्भात चौकशी झाली असून मुलगा चिन्मय याचाही झाला जबाब नोंदवण्यात आला आहे. समता पतसंस्थेत प्रतिभा चाकणकर यांच्या नावावर दोन खाते तर मुलाच्या नावावरही दोन खाते होते. चौकशी झाल्यानंतर प्रतिभा चाकणकर यांनी समता पतसंस्थेतील खाते मी उघडले नाही, असा दावा प्रतिभा चाकणकर यांनी कला आहे.

धक्कादायक बाब म्हणजे समता पतसंस्थेत प्रतिभा चाकणकरांच्या नावाने उघडलेल्या खात्यांना भोंदू अशोक खरात वारसदार होता. या खात्यावरून 2 कोटी 40 लाखांचा झाला व्यवहार झाला होता. हे खाते मी उघडले नसल्याचा प्रतिभा चाकणकर यांनी चौकशीत पोलीसांना सांगितले आहे. तसेच मी स्वत: कधीच या खात्यावरून कोणताही व्यवहार केला नाही. अशी माहिती उघड झाली आहे.

भोंदू अशोक खरात महिलांचे लैंगिक शोषण अत्याचार करून इतक्यावरच थांबला नाही तर भक्तांची लूट करण्यासाठी त्याने भोंदूगिरी च्या नावाखाली मोठा गंडा घातला. आता या सर्व प्रकरणानंतर समता पतसंस्थेच्या व्यवहारात त्याचं नाव समोर आला आहे.या पतसंस्थेत उघडलेले खाते बनावट आहे . सह्या देखील नाही एकही रुपयाची देखील उलाढाल केलेली नाही. असे गंभीर आरोप प्रतिभा चाकणकर यांनी खरातवर केले आहेत.

दरम्यान आता समता पतसंस्था देखील ईडीच्या फेऱ्यात अडकली असून ईडीकडून नऊ तासापासून चौकशी सुरू आहे. भोंदू खरात वारसदार असलेली 100 खात्यांची चौकशी सुरू आहे. खात्यावरून तब्बल साठ कोटींचा व्यवहार झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे खरातच्या भोवतीचा फास आणखीन आवळणार आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!