अशोक खरातच्या कारनाम्याची व्याप्ती भयानक! संपर्कातील तब्बल 1825 लोकांची नावे उघड होणार?


पुणे : नाशिकचा भोंदू बाबा अशोक खरात यांच्या लैंगिक अत्याचार व फसवणुकीचे धक्कादायक कारनामे समोर आले आहेत. सध्या खरात पोलीस कोठडीत असून या प्रकरणाची विशेष तपास पथकाकडून कसून चौकशी केली. आता या प्रकरणाची व्याप्ती इतकी वाढली आहे की सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी खरातच्या संपर्कात असलेल्या 1825 लोकांशी नावे उघड करण्याचा दावा केला आहे. त्यामुळे अनेकांचे धाबे दणाणले आहेत.

सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया या पत्रकार परिषदेतून अनेक खुलासे करणार आहेत.त्यानी असं म्हटलं आहे की,अशोक खरातचे सर्व कारनामे मी सांगणार आहे. आताच्या घटकेला माझ्याकडे जी माहिती आणि एक्सेलशीट आहे, त्यात एकूण 1825 नंबर आहेत. ज्यांनी अशोक खरातला कॉल केले आणि अशोक खरातने ज्यांना फोन केले अशा लोकांचे हे नंबर आहेत. या सगळ्या नंबर्समध्ये धक्कादायक बाब म्हणजे त्याच्यात आयजी लेव्हलचे अधिकारी, पीआय, सीनियर पीआय, तहसीलदार, डेप्युटी कलेक्टर आणि इतकंच नाही तर राजकारण्यांचाही समावेश आहे.

दरम्यान अशोक खरात प्रकरणात आता ईडीनेही एन्ट्री केली असल्यामुळे त्याच्या नाशिकसह पुण्यात 11 ठिकाणी छापेमारी पडली आहे. त्याची चौफेर बाजूने कोंडी केली जाणार असल्यामुळे त्याच्या अडचणीत आता आणखीन वाढ होणार आहे. खरात प्रकरणात रूपाली चाकणकर यांच्या बहिण प्रतिभा चाकणकर यांचीही चौकशी चौकशी होत आहे. त्यावरही त्यांनी प्रतिक्रिाय व्यक्त केली.

यावर बोलताना अंजली दमानिया म्हणाल्या, प्रतिभा चाकणकर यांच्यासोबत केलेल्या चौकशीतून असंख्य खुलासे होतील आणि. त्यांची जी माहिती होती की फाट आहे. त्यांचे कॉल्स कमी होते, पण त्याचे एसएमएस प्रचंड प्रमाणावर होते. म्हणजे हे सगळे व्यवहाराचे मेसेजेस होते. काही महत्त्वाच्या डिटेल्स मी शिर्डी पोलीस स्टेशनला माझ्याकडून पाठवल्या आहेत, असंही त्यांनी म्हणाल्या. त्यामुळे खरातचा पाय आणखीन खोलात जाणार आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!