विश्वास नांगरे पाटील यांचा मेसेज तुम्हाला आलाय? जाणून घ्या काय आहे कारण


पुणे : अप्पर पोलिस महासंचालक विश्वास नांगरे पाटील यांचे बनावट फेसबुक अकाऊंट बनवण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. यामुळे याची सध्या चर्चा सुरू झाली आहे.

विश्वास नांगरे पाटील यांनी याबाबतची माहिती फेसबुकवर पोस्ट केली आहे. संबधित आरोपी हा विश्वास नांगरे पाटील असल्याचे भासवून लोकांशी चॅट करत असल्याचही त्यांनी सांगितले आहे. याबाबत पोलीस तपास करत आहेत.

ते म्हणाले, काही घोटाळेबाजांनी माझ्या नावावर बनावट खाते तयार केले आहे. ते संपर्कांना खाली दिलेले संदेश पाठवत आहेत. मी तातडीने कायदेशीर कारवाई करत आहे.

परंतु कृपया प्रतिसाद देऊ नका किंवा कोणत्याही प्रकारची माहिती सामायिक करू नका. कारण हा फसवणूक करण्याचा प्रयत्न आहे! धन्यवाद. असे त्यांनी म्हटले आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!