लाडकी बहीण योजनेच्या नावाखाली धक्कादायक कांड; महिलांसोबत घडला संतापजनक प्रकार…


जळगाव : लाडकी बहीण योजनेच्या ईकेवायसीच्या नावाखाली मोठं कांड घडल्याचं समोर आलं असून महिलेकडे नको ती मागणी करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. यामुळे अख्ख्या महाराष्ट्रात खळबळ माजली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, जळगावमध्ये ई-केवायसीच्या नावाखाली गैरप्रकार झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ‘ई-केवायसी करून देतो’ असे सांगत एका नराधमाने महिलेकडे शरीरसुखाची मागणी केल्याचा आरोप आहे. तसेच आणखी एका महिलेकडे त्याने प्रेमसंबंध ठेवण्याची मागणी केल्याचेही उघड झाले आहे. या प्रकारामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

आरोपीच्या मागणीने महिला हादरली, मात्र तिने धैर्य दाखवत थेट पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. या प्रकरणी रमेश चव्हाण याच्याविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात महिलांच्या विनयभंगाचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

तक्रारीनुसार, लाडकी बहीण योजनेअंतर्गत ई-केवायसीचे काम करण्याच्या बहाण्याने आरोपी पीडित महिलेच्या घरी गेला होता. कागदपत्रे घेतल्यानंतर काम करून देण्याच्या बदल्यात त्याने शरीरसुखाची मागणी केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

याशिवाय, दुसऱ्या एका महिलेला निवृत्ती वेतन पुन्हा सुरू करून देण्याचे आश्वासन देत तिच्याकडे प्रेमसंबंधाची मागणी केल्याचा आरोपही करण्यात आला आहे. शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्याच्या नावाखाली महिलांशी गैरवर्तन केल्याने जळगावमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!