पीएम किसानचा २३ वा हप्ता अडकणार? महाराष्ट्रासह १४ राज्यांतील शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची सूचना; हे काम तातडीने करा…


नवी दिल्ली : पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेच्या २३ व्या हप्त्याची शेतकर्‍यांमध्ये प्रतिक्षा आहे. सरकार पीएम किसान योजनेत दरवर्षी ६,००० रुपये खात्यात जमा होतात. तीन टप्प्यात शेतकर्‍यांच्या खात्यात दोन हजार रुपये जमा करण्यात येतात.

पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेची रक्कम ही थेट डीबीटी पद्धतीने खात्यात जमा करण्यात येते. पुढील हप्ता जमा होण्यापूर्वी सरकारने एक मोठी अट पूर्ण करण्यास सांगितले आहे.

महाराष्ट्रासह १४ राज्यातील शेतकर्‍यांना या नियमाची पूर्तता करावी लागणार आहे. शेतकऱ्यांना फार्मर आयडी काढावा लागणार आहे. राज्यातील अनेक शेतकऱ्यांनी फार्मर आयडी काढला आहे. तर अद्याप अनेकांनी ही प्रक्रिया पूर्ण केलेली नाही. त्याशिवाय त्यांच्या खात्यात ही रक्कम जमा होणार नाही.

बोगस शेतकऱ्यांची ओळख पटावी आणि बनावट लाभार्थ्यांना आळा बसावा यासाठी फार्मर आयडी बंधनकारक करण्यात आला आहे. कृषी योजनांचा लाभ खऱ्या शेतकऱ्यांनाच मिळावा यासाठी ही महत्त्वाची तरतूद करण्यात आली आहे.

सरकारी योजनांचा लाभ किती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचतो याची अचूक माहिती मिळावी म्हणून शेतकऱ्यांचे डिजिटल ओळखपत्र तयार केले जात आहे, ज्याला फार्मर आयडी असे म्हणतात.

फार्मर आयडी हे शेतकऱ्यांचे डिजिटल प्रोफाईल असून त्यामध्ये त्यांच्या जमिनीची सविस्तर माहिती नोंदवलेली असते. शेतकऱ्यांची जमीन कुठे आहे, किती क्षेत्र आहे, तसेच सध्या कोणते पीक घेतले आहे यासह इतर आवश्यक माहिती या प्रणालीत जतन केली जाते.

दरम्यान, फार्मर आयडी तयार करण्यासाठी शेतकऱ्यांना AgriStack Portal वर जावे लागेल. या ठिकाणी पासवर्ड आणि युझर आयडी तयार करावा लागेल. ‘Create New User’ च्या पर्यायावर क्लिक करा. अटी आणि शर्तीचा फॉर्म सबमिट करा. यानंतर आधार कार्डशी लिंक मोबाईल क्रमांकावर ओटीपी येईल. व्हेरिफिकेशन प्रक्रिया पूर्ण करा. पुन्हा एकदा हिच प्रक्रिया पूर्ण करा. ओटीपीने व्हेरिफाय करा.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!