“रिश्ते ही मायने रखते है” ; सुनेत्रा वहिनींसाठी सुप्रिया सुळे यांचा खंबीर पाठिंबा, दिले थेट संकेत..


पुणे : महाराष्ट्राचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर अख्या पवार कुटुंबीयांना मोठा धक्का बसला होता. त्यांच्या निधनानंतर आता बारामती विधानसभा पोटनिवडणूक होत आहे. या निवडणुकीसाठी त्यांच्या पत्नी आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार रिंगणात उतरल्या आहेत. या पार्श्वभूमीवर आता खासदार सुप्रिया सुळे यांनी त्यांना पाठिंबा देण्याचे थेट संकेत दिले आहेत.

बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेतल्यानंतरही निवडणूक बिनविरोध होणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. या पार्श्वभूमीवर खासदार सुप्रिया सुळे यांनी महत्त्वाची प्रतिक्रिया दिली आहे.त्या म्हणाल्या,आपण एक मतदार म्हणून बारामतीला मतदान करायला जाणार आहोत. अजित पवार गटाने प्रचारासाठी विचारले तर त्यावर विचार करू. शेवटी रिश्ते मायने रखते है.” असे म्हणत त्यांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला आहे

दरम्यान सुप्रिया सुळे म्हणाल्या, पैसा आणि सत्ता यापेक्षा कुटुंब महत्वाचे आहे.त्यामुळे मी नेहमी म्हणते रिश्ते मायने रखते हे असे सांगत त्यांनी पुन्हा संपूर्ण कुटुंब सुनेत्रा पवार यांच्या पाठीशी असल्याचे स्पष्ट केलं. दरम्यान, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या महायुतीच्या उमेदवार असून त्यांच्या विजयाची शक्यता मजबूत मानली जात आहे.

या बारामती पोटनिवडणुकीसाठी काँग्रेसने आकाश मोरे यांची उमेदवारी मागे घेतल्याने त्यांच्या मार्गातील मोठा अडथळा दूर झाला आहे. सुनेत्रा पवार किती मताधिक्याने विजयी होतील, यावर प्रतिक्रिया देताना सुळे यांनी थेट उत्तर देणे टाळले. यानंतर आता चर्चांना उधाण आल आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!