सांगलीत अघोरी विद्येचा धक्कादायक प्रकार उघडकीस; स्मशानभूमीत काळी बाहुली, लिंबू व जादूटोण्याचे साहित्य आढळल्याने खळबळ


सांगली : खरात प्रकरणातून आजच्या आधुनिक काळात काळी जादू आणि अघोरी कृत्यांवर विश्वास ठेवणारा समाज मोठ्या प्रमाणावर असल्याचे समोर आले आहे. अशी अनेक प्रकरणे सध्या महाराष्ट्रात घडताना पहायला मिळत आहेत. सांगलीतही आता अघोरी विद्येचा थरार पहायला मिळाला असून यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील शेणे येथे स्मशानभूमीत संशयित अंधश्रद्धेशी संबंधित प्रकार उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे. मध्यरात्रीच्या सुमारास घडलेल्या या घटनेनंतर परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.

सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील शेणे येथील स्मशानभूमी परिसरात सकाळच्या सुमारास काही संशयित वस्तू आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. काळे कापड, बाहुली, लिंबू, सुया, कोहळे आणि नारळ अशा वस्तू विखुरलेल्या अवस्थेत दिसून आल्या.

या प्रकारामुळे परिसरात चर्चा आणि भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. गेल्या काही दिवसांपासून अशा घटनांचे प्रमाण वाढत असल्याने नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली असून स्थानिकांनी यावर चिंता व्यक्त केली आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!