सोन्याच्या किंमतीचा भडका! प्रति तोळा 1000 रुपयांन महागलं, आजचा दर काय?


पुणे : आखाती देशात सुरू असलेले इराण आणि इस्रायल यांच्यातील युद्ध तात्पुरते थांबवण्यात आले. याचा थेट परिणाम कच्चे तेल आणि सोन्याच्या दरावर पडला आहे. आज सोन्या-चांदीच्या दरात मोठी वाढ झाली आहे. 24 कॅरेट सोनं प्रति तोळा ₹1000 ने वाढून ₹1.55 लाखांवर पोहोचलं असून चांदीच्या दरातही मोठी उसळी दिसून आली आहे.

मुंबई आणि पुण्यासह सराफा बाजारत आज सोन्याचे दर मोठ्या प्रमाणात वाढले. 24 कॅरेट सोन्याचे दर प्रति तोळा एक हजार रूपयांनी वाढून 1 लाख 55 हजार 15 रूपयांवर पोहचले आहेत. तर चांदीचे दर जीएसटीसह 5 हजारांनी वाढून 2 लाख 52 हजार 350 रुपयांवर पोहचले आहेत. इराण-इस्त्राइलमधील युद्धविरामाची डोनाल्ड ट्रम्प यांनी घोषणा केल्यानंतर सोन्या चांदीच्या दरात वाढ होत आहे.

सोमवारपासून सोन्याचे आणि चांदीच्या दरात बदल होत आहे. ऐन लग्नसराईत सोन्याच्या दरात वाढ झाल्यामुळे ग्राहकांना मोठा धक्का बसला आहे.जर युद्ध पुढे नाही थांबले तर नाही सोने दर 1लाख 80 पर्यंत दर वाढतील आणि युद्ध थांबले तर सव्वा लाखांवर येईल असा अंदाज वर्तवण्यात येत आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!