राजकीय भूकंप! उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेचीं ठाकरेंच्या 8 खासदारांसोबत बैठक? खासदारांच्या धडाधड प्रतिक्रिया..


मुंबई: शिवसेना शिंदे गटाचे मुख्य नेते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ‘ऑपरेशन टायगर’ला चांगलाच वेग दिला असून ठाकरे गटाच्या आठ खासदारांना गळाला लावली असल्याची चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगली आहे. त्यानंतर आता ठाकरेंच्या खासदारांनी या बैठकीबाबतच्या चर्चा नाकारल्याची माहिती समोर आली आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि ठाकरे गटातील काही खासदारांची गोपनीय बैठक झाल्याची माहिती समोर आली आहे.या बैठकीत ठाकरे गटाचे सहा खासदार प्रत्यक्ष उपस्थित होते, तर दोन खासदारांनी ऑनलाइन माध्यमातून सहभाग नोंदवला होता.यामध्ये संजय दिना पाटील, अरविंद सावंत यांच्यासह विदर्भातील संजय देशमुख, मराठवाड्यातील नागेश पाटील आष्टीकर आणि ओमराजे निंबाळकर, तसेच राजाराम वाकचौरे, राजाभाऊ वाजे आणि संजय जाधव या खासदारांच्या उपस्थितीची राजकीय वर्तुळात मोठी चर्चा रंगली आहे.

दरम्यान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या सर्व चर्चेचे जोरदार खंडन केले आहे. ठाकरे गटांच्या खासदारांसोबत बैठक झाल्याचे वृत्त पूर्णपणे निराधार आणि खोडसाळ आहे,अशा स्पष्ट शब्दांत त्यांनी या प्रकरणावर आपली अधिकृत भूमिका मांडली आहे.

तसेच ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत, ओमराजे निंबाळकर, राजाभाऊ वाजे यांनी बैठकीचा इन्कार केला आहे. अरविंद सावंत यांनी हे वृत्त खोडसाळ असून कायदेशीर कारवाई करणार असल्याचे म्हटले आहे. येत्या 24 एप्रिल रोजी सुप्रीम कोर्टात शिवसेना पक्षाची सुनावणी आहे. त्याआधीच हे वृत्त येणे योगायोग नसल्याकडे त्यांनी लक्ष वेधले आहे. दरम्यान या चर्चामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!