खरात प्रकरणात नव्या पात्राची एन्ट्री! बनावट आणि स्वस्त खड्यांची भुरळ पाडून भक्तांना गंडा


पुणे : भोंदूगिरीच्या नावाखाली महिलांचे लैंगिक शोषण आणि अत्याचार करणारा अशोक खरात केवळ शोषणावरच थांबला नाही, तर त्याने भक्तांची आर्थिक लूट करण्यासाठीही मोठे जाळे विणले असल्याची धक्कादायक माहिती समोर आली.या तपासात आता महेश कलंत्री या नव्या पात्राची एन्ट्री झाली आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार, नाशिकचा भोंदू बाबा अशोक खरात याला आर्थिक लूट करण्यासाठी मदत करणारा कारणीभूत ठरलेला महेश कलंत्री व्यक्ती महत्त्वाचा पुरावा ठरत आहे. तपासात समोर आले आहे की, कलंत्री हा खरातला बनावट आणि स्वस्त खडे पुरवत असे. खरात हेच खडे सिद्ध केलेले असल्याचे सांगून भक्तांना लाखो रुपयांना विकत असे.महेश कलंत्रीने हे खडे कुठून मिळवले, या नफ्यातील वाटा कोणाकोणाला जात होता, याचा तपास आता पोलीस करत आहेत. कलंत्रीच्या अटकेनंतर या रॅकेटमधील आणखी काही मोठे मासे गळाला लागण्याची शक्यता आहे.

दरम्यान अशोक खरातला अटक केल्यानंतर पोलिसांसह एसआयटीकडून त्याचा बंगला, ऑफिससह विविध ठिकाणी तपासणी केली जात आहे. एसआयटीने अशोक खरातच्या कॅनडा कॉर्नर येथील मुख्य कार्यालयावर छापा टाकून लॅपटॉप, दोन पेन ड्राईव्ह आणि 64 GB क्षमतेचे ओटीजी डिव्हाईस जप्त केले आहेत. या उपकरणांच्या फॉरेन्सिक तपासणीतून तब्बल 160 GB डेटा रिकव्हर करण्यात आला आहे.

दरम्यान आता याप्रकरणी नाशिक पोलिसांनी स्थापन केलेल्या विशेष तपास पथकाने अशोक खरातच्या गुन्ह्यांचे धागेदोरे शोधून काढले आहेत. आता या प्रकरणात महेश कलांत्रीच्या एंट्रीने या प्रकरणाला नव वळण लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!