तो २२ वर्षांचा, ती ३५ वर्षांची विवाहित, काकांसोबत सेक्सवरुन दोघांचं वाजलं अन् पुढे जे घडलं ते थरकाप उडवणारं…


दिल्ली : दिल्लीतील मंगोलपुरी परिसरात घडलेल्या एका धक्कादायक हत्याकांडाने परिसरात खळबळ उडाली आहे. २२ वर्षीय तरुणाने ३५ वर्षीय विवाहित महिलेची हत्या करून तिचा मृतदेह घरातील डबल बेडच्या बॉक्समध्ये लपवून ठेवला होता. ही घटना मंगळवारी दुपारी उघडकीस आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी तरुण हा पेईंग गेस्ट म्हणून त्या परिसरात राहत होता. वयात तब्बल १३ वर्षांचे अंतर असतानाही आरोपी आणि मृत महिलेचे एकमेकांशी संबंध होते. मात्र, काही वैयक्तिक कारणांवरून दोघांमध्ये वाद निर्माण झाला होता.

तपासादरम्यान पोलिसांनी आरोपीसह त्याचे सुमारे ५० वर्षीय काका आणि काकांचा ५२ वर्षीय मित्र अशा तिघांना अटक केली आहे. या तिघांनी मिळून महिलेची हत्या केल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. हत्या केल्यानंतर पुरावे लपवण्यासाठी मृतदेह बेड बॉक्समध्ये ठेवण्यात आला होता.

तपासात धक्कादायक माहिती समोर आली असून वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटनेचा सविस्तर उलगडा केला आहे. त्यांच्या माहितीनुसार, आरोपीने प्रथम महिलेला जमिनीवर पाडले. खाली पडताना तिच्या कपाळाला गंभीर दुखापत झाली. त्यानंतर आरोपीने ब्लँकेटच्या साहाय्याने तिचा गळा आवळला, ज्यामुळे तिचा श्वास गुदमरून मृत्यू झाला.

हत्या केल्यानंतर आरोपीने महिलेचा मृतदेह घरातील डबल बेडच्या बॉक्समध्ये लपवून ठेवला. हा प्रकार त्या ठिकाणीच घडला जिथे आरोपी आपल्या मित्रासोबत पेईंग गेस्ट म्हणून राहत होता. तपासादरम्यान या प्रकरणातील आणखी धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत.

पोलिसांच्या माहितीनुसार, मृत महिला आणि मुख्य आरोपी यांच्यात प्रेमसंबंध होते. आरोपीचा मंगोलपुरी परिसरात चिकन शॉप असून तो स्थानिक पातळीवर परिचित होता.मंगळवारी सायंकाळी सुमारे ४.३० वाजण्याच्या सुमारास आरोपी आणि महिला दोघेही संबंधित खोलीत गेले. काही वेळाने आरोपीचे काका आणि त्यांचा मित्रही तेथे पोहोचले. त्यानंतर आरोपीने महिलेला आपल्या काकांसोबत शारीरिक संबंध ठेवण्यास भाग पाडण्याचा प्रयत्न केला. मात्र, महिलेने ठाम नकार दिला.

या नकारामुळे संतापलेल्या आरोपीने प्रथम महिलेला जमिनीवर पाडले आणि नंतर तिचा गळा आवळून हत्या केल्याचे तपासात उघड झाले आहे. ही माहिती तपास अधिकाऱ्यांनी दिली असून या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

या गुन्ह्यात आरोपीला त्याच्या काका आणि काकांच्या मित्राने मदत केल्याचेही तपासात समोर आले आहे. घटना घडत असताना हे दोघेही रूमच्या बाहेर पहारा देत उभे होते. त्यानंतर त्यांनी आरोपीला घटनास्थळावरून पळून जाण्यास मदत केली, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

दिल्लीतील मंगोलपुरी परिसरात घडलेल्या हत्याकांडाचा उलगडा करताना पोलिसांनी महत्त्वाची माहिती दिली आहे. मंगळवारी सायंकाळी सुमारे सातच्या सुमारास मंगोलपुरी पोलीस ठाण्याला फोन करून पत्थर मार्केटमधील एका इमारतीतील रूममधील बेड बॉक्समध्ये महिलेचा मृतदेह आढळल्याची माहिती देण्यात आली. यानंतर पोलीस पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!