संशयाच पिशाच्च अंगात संचारल! नराधम पतीकडून पत्नीवर चाकूने सपासप तब्बल 13 वार, रक्ताचा सडाच सडा….

पुणे : चारित्र्याच्या संशयावरून एका नराधम पतीने आपल्या पत्नीवर भररस्त्यात चाकूने सपासप तब्बल 13 वार करून तिला जीवे मारण्याचा प्रयत्न केला असल्याची धक्कादायक घटना जळगाव जिल्ह्यातील धरणगाव शहरात घडली आहे. भर रस्त्यात केलेल्या या वारामुळे भर रस्त्यात रक्ताचा सडा सडा पसरला. या घटनेने परिसरात संतापाची लाट पसरली आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार, दीपक लोंढे आणि सोनल लोंढे यांच्यात गेल्या काही काळापासून चारित्र्याच्या संशयावरून खटके उडत होते. आरोपी पती सातत्याने तिच्यावर संशय घेत असल्याने घरात वादाचे वातावरण होते. सोनल कामावर होती त्यावेळी पती दीपक लोंढे याने तिला बोलण्याच्या बहाण्याने बाहेर बोलावले. सोनल बाहेर येताच पूर्वनियोजित कट रचलेल्या दीपकने क्रूरतेची सीमा ओलांडली. तिच्या डोळ्यात मिरचीची पूड टाकून चाकूने सपासप वार केले.
पती आरोपीने रागाच्या भरात सोनलच्या हात, पाय, पोट आणि पाठीवर एकामागून एक 13 वार केले. भररस्त्यात सुरू असलेल्या या रक्तरंजित खेळामुळे परिसरात एकच खळबळ उडाली. गंभीर जखमांमुळे आणि अतिरक्तस्त्रावामुळे सोनल जागीच कोसळली. तिला तातडीने धरणगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले,

मात्र चाकूने केलेल्या या सपासप वारामुळे तिची प्रकृती चिंताजनक असल्याने अधिक उपचारासाठी जळगाव जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले आहे. सध्या तिची मृत्यूशी झुंज सुरू आहे.घटनेची माहिती मिळताच धरणगाव पोलिसांनी तातडीने आरोपी पती दीपक लोंढे याला बेड्या ठोकल्या आहेत. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे