बारामती पोटनिवडणुकीनं राजकारण ढवळलं! ‘वर्षा’ बंगल्यावर मुख्यमंत्री अन् सुनेत्रा पवारांच्यात खलबत्त, काँग्रेसच टेन्शन वाढलं?


पुणे : महाराष्ट्राचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर बारामती विधानसभा पोटनिवडणूक होत आहे. ही निवडणूक बिनविरोध होण्याच्या अशा मावळल्या असताना आता काँग्रेसकडून उमेदवार उतरण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर आज उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची त्यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी भेट घेतली. या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आल आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार, वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यामध्ये तब्बल एक तास बैठक झाली. या बैठकीत महायुतीकडून ही विशेष रणनीती आखली जात असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. विशेष म्हणजे या भेटीत देवेंद्र फडणवीस यांनी सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार यांना एक महत्त्वाचा शब्द दिला आहे.

बारामती पोटनिवडणुकीत भाजप मोठा भाऊ म्हणून पाठीशी उभा राहील. तसेच सुनेत्रा पवारांना निवडून आणण्यासाठी भाजप आवश्यक ती मदत करेल असं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्यामुळे काँग्रेसच टेन्शन आता वाढल आहे. काँग्रेसने या निवडणुकीसाठी आकाश मोरे यांना संधी दिली आहे. तर महायुतीकडून अजित पवारांच्या पत्नी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांना संधी देण्यात आली आहे.

वर्षा बंगल्यावर झालेल्या या बैठकीत आगामी पोटनिवडणुकीत महायुतीची ताकद प्रदर्शन कसे असावे आणि समन्वयाने निवडणूक कशी लढवावी यावर भर देण्यात आला असल्याची माहिती समोर आली आहे. भाजपचाही उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना पाठिंबा असल्यामुळे बारामतीच मैदान कोण मारणार याकडे राजकीय वर्तुळाच्या नजरा लागल्या आहेत.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!