खरात प्रकरणात व्हिडिओ व्हायरल करणाऱ्यांचे धाबे दणाणले! अवघ्या 20 रुपयांसाठी व्हायरल झाले व्हिडिओ, सायबर सेलच कडक पाऊल..

पुणे : नाशिकचा भोंदूबाबा अशोक खरातच्या काळ्या कारनाम्याची मालिका समोर येत असतानाच आता सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओंबाबत महत्त्वाची माहिती समोर आली आहे. आतापर्यंत अशोक खरातचे एकूण 17 व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. हे व्हिडीओ अवघ्या 20 ते 25 रुपयांसाठी व्हायरल केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार, महिलांचे लैंगिक शोषण आणि अत्याचार प्रकरणात अटकेत असलेला नाशिकचा भोंदू बाबा अशोक खरात याच्याशी संबंधित सुमारे 15 ते 17 अश्लील व्हिडिओ फेसबुक इंस्टाग्राम, टेलिग्राम आणि काही पॉर्न सेटवर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाल्याच समोर आल आहे. याप्रकरणी सायबर सेल आता ॲक्शन मोडवर आला असून सेलने आता कठोर पावलं उचलण्यास सुरुवात केली आहे.
अशोक खरात आणि काही पीडित महिलांचे आक्षेपार्ह व्हिडिओ सोशल मीडियावर प्रसारित केल्याप्रकरणी सायबर सेलने अधिकृतपणे एफआयआर दाखल केली आहे. आयटी कायद्याच्या कलम ६७ अंतर्गत हा गुन्हा नोंदवण्यात आला असून, या कारवाईमुळे संबंधित संशयितांचे धाबे दणाणले आहेत. हे व्हिडीओ व्हायरल करणाऱ्यांच्या अडचणीत मोठी वाढ होणार आहे.

अशोक खरात प्रकरणातील हे व्हिडीओ पाहण्यासाठी इच्छुक असलेल्या व्यक्तींकडून 20 ते 25 रुपये प्रति व्हिडिओ अशी रक्कम उकळली जात होती. पैसे भरल्यानंतर संबंधित व्यक्तींना वैयक्तिक अकाऊंटवर हे व्हिडिओ पाठवले जात असल्याचं पोलीस तपासात उघड झालं आहे.सायबर गुन्हेगारांचा शोध सुरू असून, या प्रकरणात सामील असलेल्या आरोपींना लवकरच बेड्या ठोकल्या जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे