लग्नाच्या चारच महिन्यांत सूरज चव्हाणच्या घरी पाळणा हलणार? बायकोनं बेबी बंपसह फोटो केले शेअर, चाहते खुश…

पुणे : गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेला ‘बिग बॉस मराठी’ सीझन 5 चा विजेता आणि सोशल मीडिया स्टार सूरज चव्हाण आणि त्याची पत्नी संजना चव्हाण आता पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत.त्याचे विडिओमुळे तो सगळीकडे फेमस झाला होता. आता पुन्हा एकदा तो बाप होणार असल्याने चर्चेत आला आहे.

सध्या दोघांच्या आयुष्यात चिमुकल्या पाहुण्याची चाहुल लागली की, काय? अशा चर्चांना उधाण आलं आहे. याबाबत संजनानं तिच्या अधिकृत हँडलवरुन एक फोटो शेअर केला आहे. त्यामध्ये तिचा बेबी बंप दिसतोय. सूरज आणि संजनाने गेल्या वर्षी 29 नोव्हेंबर रोजी आपली लग्नगाठ बांधलेली. अशातच लग्नाच्या चारच महिन्यांत संजना आणि सूरजकडे खरंच गूड न्यूज आहे का? असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे. तर, अनेकांकडून संजना आणि सूरज यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होतोय.
संजनानं तिच्या अधिकृत सोशल मिडिया हँडलवर दोन फोटो शेअर केलेत. या फोटोमध्ये संजनाचा बेबी बंप दिसतोय, त्यासोबतच तिनं अलका कुबल स्टारर मराठीतील गाजलेला सिनेमा ‘देवकी’तलं गाणंही जोडलं आहे. त्यामुळे आता सूरज चव्हाण लवकरच बाबा होणार अशा चर्चांना उधाण आलं आहे. सूरज चव्हाणच्या बायकोचा हा लूक डोहाळे जेवणाचा असल्याचंही काहींचं म्हणणं आहे.

सूरज चव्हाणची बायको संजनानं 17 मार्च रोजी एक कमेंट केलेली. त्यावेळी त्यामध्ये संजनानं थेट काहीच सांगितलेलं नव्हतं. पण, चाहत्यांनी अंदाज बांधत तिचं अभिनंदन करण्यास सुरुवात केलेली. आता पुन्हा एकदा तशाच प्रकारची पोस्ट केल्यानं चाहत्यांमध्ये कमालीची उत्सुकता निर्माण झाली आहे. काहींना प्रश्न पडलाय की, हा फोटो AI जनरेट तर नाही ना? संजनानं तिच्या फोटोवरचं कमेंट सेक्शन बंद ठेवलं आहे. त्यामुळे सोशल मीडियावर जोरदार चर्चांना उधाण आलं आहे.
त्यामुळे सूरज आणि संजनावर कौतुकाचा वर्षाव केला जातोय. संजनानं पोस्ट शेअर करताना कमेंट सेक्शन बंद ठेवलंय, तर फोटो शेअर करताना तिनं फक्त रेड हार्ट, ब्ल्यू आय आणि प्रेग्नेंट बाई अशा इमोजीचा वापर केलाय. हा फोटो पाहून काहींना सूरज आणि संजनाच्या आयुष्यात लवकरच छोट्या पाहुण्याचं आगमन होणार असल्याचं वाटतंय.