माता नं तू वैरीन! दुसऱ्या लग्नासाठी विवाहितेकडून पोटच्या बाळाची हत्या, पुरावा नष्ट करण्यासाठी रक्त धुतलं अन्…

पुणे : पुण्यातील शिरूर तालुक्यातील भांबर्डे येथे आई आणि बाळाच्या नात्याला कलंक फासणारी घटना समोर आली आहे. दुसऱ्या लग्नासाठी मुलगा आड येत असल्याने आईने स्वतःच्या 11 महिन्याच्या मुलाची हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.इतकेच नव्हे, तर या गुन्ह्याचे पुरावे नष्ट करण्यासाठी रक्त धुवून टाकत त्याचा मृतदेह कपड्यांच्या बॅगेत भरला. या घटनेने परिसरात संताप व्यक्त केला जात आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार, पूजा पवार असे आरोपी आईचे नाव आहे. पूजाने मुलगा यश पवार (११ महिने) याला निर्घृणपणे संपवलं. मुलगा सतत रडायचा. त्यात आरोपीला पूजाला दुसरे लग्न करायचे होते. मात्र लग्नात मुलाचा अडथळा ठरेल, या विकृत विचारातून आईनेच लेकाचा जीव घेतल्याची धक्कादायक कबुली पोलीस चौकशीत दिली आहे.
धक्कादायक बाब म्हणजे पूजाने आपल्या मुलाचे डोके घरासमोरील सिमेंट ओट्यावर आपटून त्याची हत्या केली.आईने मायेचा संबंध विसरून स्वत:च्या स्वार्थासाठी पोटच्या लेकाची हत्या केल्याने परिसरात संताप व्यक्त केला जात आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी महिलेला अटक केली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू करण्यात आला आहे.

या गुन्ह्याचे पुरावे नष्ट करण्यासाठी रक्त धुवून टाकत त्याचा मृतदेह कपड्यांच्या बॅगेत भरला. त्यानंतर त्या बॅगेत दगड टाकले. शेतातील विहिरीत फेकून दिले. या घटनेने परिसरात संताप व्यक्त केला जात आहे.