PM किसान योजनेबाबत महत्वाचा निर्णय! शेतकऱ्यांनो ‘या’ अटी पूर्ण करा,अन्यथा मिळणार नाही 23 वा हफ्ता?

पुणे : देशातील लहान व अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची ठरलेली PM किसान सन्मान निधी योजना पुन्हा चर्चेत आली आहे. शेतकऱ्यांसाठी या योजनेतून आर्थिक सहाय्य मिळते. या योजनेचा 22 वा हफ्ता वितरित झाल्यानंतर आता शेतकरी 23 व्या हप्त्याच्या प्रतीक्षेत आहेत. मात्र हे पैसे जमा होण्यासाठी शेतकऱ्यांना काही अटी पूर्ण करावयाच्या आहेत. तरच 23 वा हप्ता खात्यात जमा होऊ शकतो.

समोर आलेल्या विविध अहवालांनुसार शेतकऱ्यांच्या खात्यात 23 वा हप्ता जुलै 2026 दरम्यान जमा होण्याची शक्यता आहे. या योजनेअंतर्गत दरवर्षी 6000 रुपये तीन हप्त्यांमध्ये (प्रत्येकी 2000 रुपये) थेट बँक खात्यात जमा केले जातात.मात्र काही तांत्रिक व कागदपत्रांच्या त्रुटींमुळे अनेक शेतकऱ्यांचे पैसे अडकण्याची शक्यता असल्याने वेळेत आवश्यक प्रक्रिया पूर्ण करणे महत्त्वाचे ठरत आहे.
शेतकऱ्यांचा 23 वा हप्ता अडकू नये यासाठी खालील तीन गोष्टी पूर्ण असणे अत्यावश्यक आहे:

1. शेतकऱ्यांनी स्वतःचे नाव लाभार्थी यादीत आहे की नाही हे पाहण्यासाठी अधिकृत संकेतस्थळावर जाऊन “Beneficiary List” पर्याय निवडावा. त्यानंतर राज्य, जिल्हा, तालुका व गावाची माहिती भरून संपूर्ण यादी पाहता येते. यामुळे हप्त्याची स्थितीही समजू शकते.
2. या योजनेबाबतच्या जर सर्व अटी पूर्ण असूनही हप्ता खात्यात जमा झाला नसेल, तर शेतकरी सरकारच्या हेल्पलाइनवर संपर्क साधू शकतात. सकाळी 9.30 ते सायंकाळी 6 या वेळेत 155261किंवा 011-24300606या क्रमांकांवर मदत उपलब्ध आहे.
3. प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेचा 23 वा हप्ता वेळेत मिळण्यासाठी शेतकऱ्यांनी ई-केवायसी, आधार लिंकिंग आणि भू-पडताळणी ही कामे तातडीने पूर्ण करणे आवश्यक आहे. अन्यथा पात्र असूनही हप्ता अडकू शकतो. त्यामुळे शेतकऱ्यांनी या सर्व अटी पूर्ण करणे बंधनकारक आहे.