3 एप्रिलला महाराष्ट्रातील बँका आणि शाळेला सुट्टी; काय आहे कारण?


पुणे: महाराष्ट्रातील बँका आणि शाळेला उद्या म्हणजे 3 एप्रिल 2026 ला गुड फ्रायडेची सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.त्यामुळे आता शाळा थेट सोमवारी सुरु होणार आहे.सुट्टीमुळे बँकेच्या शाखा देखील बंद राहणार असल्या तरी डिजिटल बँकिंग चॅनेल, इंटरनेट बँकिंग पोर्टल, बँकांची मोबाईल ॲप्लिकेशन्स आणि एटीएम सुरु असणार आहे.

इस्टरच्या आधी पाळला जाणारा गुड फ्रायडे, हा येशू ख्रिस्ताच्या मृत्यूचे स्मरण करण्यासाठी पाळला जातो. प्राचीन ख्रिस्ती काळापासून, हा दिवस शोक, आध्यात्मिक चिंतन आणि उपवासाच्या प्रथांसाठी राखून ठेवला गेला आहे. जगात गुड फ्रायडेची सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

गुजरात, मिझोराम, महाराष्ट्र, कर्नाटक, मध्य प्रदेश, ओडिशा, तामिळनाडू, उत्तराखंड, सिक्कीम, तेलंगणा, मणिपूर, अरुणाचल प्रदेश, उत्तर प्रदेश, केरळ, नागालँड, पश्चिम बंगाल, नवी दिल्ली, गोवा, बिहार, छत्तीसगड, झारखंड, मेघालय, हिमाचल प्रदेश आणि आंध्र प्रदेश यांसारख्या ठिकाणी गुड फ्रायडे निमित्त बँका बंद राहणार आहेत.

भारतात आणि महाराष्ट्रात बँक आणि शाळेला गुड फ्रायडेची सुट्टी आहे की नाही याबद्दल संभ्रम आहे. मात्र गुड फ्रायडेला म्हणजे 3 एप्रिल 2026 ला शाळेला आणि बँकेला सुट्टी असणार आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!